Devendra Fadanvis : ‘त्या’ सहकार सम्राटाने केले नाही… ते कर्ज अमित शाहंनी माफ केले!
मुंबई : महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि सहकार क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचा क्षेत्र आहे. जवळजवळ २०-२५ वर्षांपूर्वी येथील कारखान्यांवर इन्कम टॅक्स लागला. सहकारी साखर कारखान्यांनी जो एफआरपी दिला. म्हणजे शेतकऱ्यांना जे चुकारे दिले त्याच्यावर इन्कम टॅक्स लागला. तेव्हापासून कोर्टात केस चालू होती. आमचे राज्यकर्ते कमीत कमी ५० वेळा वेगवेगळ्या पंतप्रधानांना भेटले. पण कधी त्याच्यावर निर्णय झाला नाही. केंद्रील सहकार मंत्री अमित शहा यांनी त्याच्यासाठी पुढाकार घेतला. २०१६ नंतरचा इन्कम टॅक्स त्या ठिकाणी त्यांनी रद्द केला. त्यामळे १० हजार कोटी रुपयांचे शेतक ऱ्यांचे कर्ज माफ केले. २० वर्षे जे महाराष्ट्रात सहकार सम्राट म्हणून घेत होते. ते करु शकले नाहीत, ते कर्ज आमच्या अमित शाहंनी माफ केले, असे म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर टीका केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील महत्वाची वैशिष्ट्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजावून सांगितले. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात २० वर्षे सहकार सम्राट म्हणून मिरवत होते. मात्र, त्यांनी कधीही या साखर कारखान्यांचे आणि त्यावर आवलंबून असलेल्या शेतक ऱ्यांचे कर्ज माफ करावे म्हणून प्रयत्न केले नाही.
अर्थसंकल्प हा समाजातल्या विशिष्ट वर्गाच्या चर्चेचा विषय होता. इंडस्ट्री असेल स्टॉक मार्केट असेल तेवढ्यापुरतं अर्थसंकल्पाची चर्चा व्हायची. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये या अर्थसंकल्पाचे सार्वत्रिकरण केले आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्पाची चर्चा, व्याप्ती आणि परिणाम हा सर्वसामान्य माणसावर त्या ठिकाणी होतो, असे देखील फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले की, आपण विकास आणि रोजगारांना चालना देणारा अर्थसंकल्प म्हणू शकतो. एक अतिशय मजबूत अशा प्रकारची अर्थव्यवस्था तयार करणारा बजेट असं देखील याचा वर्णन हे आपण करू शकतो. पहिला विकास इंक्लुज डेव्हलपमेंट, दुसरा आहे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, तिसऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट वाढवणे, चौथा आहे देशातल्या युवाशक्तीला एम्पावर करणे, असे या बजेटचे महत्वाचे भाग आपल्याला करता येईल.