अयोध्या दौरा ! फडणवीसांचे शिंदेंना ‘सरप्राईज’

Untitled Design   2023 04 09T080314.707

Devendra Fadnavis Ayodhya Tour : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार – खासदारासह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. आगामी निवडणुका तसेच हिंदुत्वाचा अजेंडा हे सगळं पाहता शिंदे यांचा हा दौरा राज्यातील राजकारणासाठी महत्वाचा असणार आहे. आता शिंदे यांच्या सेनेपाठोपाठ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. फडणवीसांचा हा दौरा पूर्वनियोजित नव्हता मात्र अचानक फडणवीस हे देखील अयोध्या दौऱ्यावर निघाल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्येला जाणार हे निश्चित होते. त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रमही जाहीर झाला तसेच यासाठी खास टिझर देखील बनवण्यात आला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदे हे हे शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येत दाखल झाले. अयोध्येत जात ते प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहे.

चिंता वाढली! कोविडनंतर देशात आढळला नवा व्हायरस…

शिवसेनेच्या दौऱ्याला भाजपाची साथ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरविल्यानुसार केवळ शिवसेनेच अयोध्या दौऱ्यावर जाणार होती. शिंदे येणार म्हणून अयोध्येत योगी सरकारकडून देखील तयारी करण्यात आली आहे. जागोजागी पोस्टर लावण्यात आलं आहे. शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अयोध्या दौऱ्याला निघाले आहेत. विशेष म्हणजे फडणवीस यांच्यासोबत भाजपचे सर्वच मंत्री असणार आहेत.

स्टेट बँकेत 1022 पदांची भरती! 30 एप्रिलपर्यंत ‘हे’उमेदवार भरू शकता अर्ज, थेट इंटरव्ह्यू अन् जॉईनिंग

मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच आपण अयोध्येत जाणार व प्रभू रामाचं दर्शन घेणार अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळेच ते आपल्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला गेले. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विशेष विमानाने आपल्या सहकाऱ्यांसोबत अयोध्येला गेले. त्यांच्यासोबत भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन होते. मात्र, एकनाथ शिंदे हे लखनऊ विमानतळावर पोहचेल आणि फडणवीसही अयोध्या दौऱ्यावर येणार याची माहिती शिंदे यांना देण्यात आली.

Tags

follow us