विश्वजीत कदम जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, वेगळ्याच कनेक्शनची चर्चा

विश्वजीत कदम जेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या पाया पडले, वेगळ्याच कनेक्शनची चर्चा

पुणे : राज्यातील राजकारणात पुण्यातील एका घटनेनं चर्चांना उधान आलंय. पुण्यामध्ये एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे मातब्बर आणि निष्ठावंत नेते विश्वजीत कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचं गाडीतून आले, असं असतानाही त्यांच्याकडं कानाडोळा करुन विश्वजीत कदम हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाया पडले. याच्यामागचं नक्की काय कारण असावं? याच्यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे मोठे नेते आपल्याकडं वळवून घेतले होते. भाजपमध्ये त्यावेळी मोठ्या प्रमाणात इतर पक्षांमधून अनेक नेतेमंडळींची आवक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या लाटेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी मोठे प्रयत्न करुनही त्यांच्या हाताला मात्र कॉंग्रेसचे काही मातब्बर नेते मात्र लागू शकले नाही. त्यातील एक मोठं नाव म्हणजे कॉंग्रेसचे माजी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री विश्वजीत कदम हे आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजीत कदम यांना पक्षात खेचण्याचा मोठा प्रयत्न केला होता. त्यांच्या वडिलांपासून चालत आलेले कॉंग्रेसचे विचार आणि शिकवण यामुळं विश्वजित कदम यांनी कॉंग्रेससोबतचं राहणं पसंत केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करुन राज्यात सरकार स्थापन केलं खरं पण पुढे देवेंद्र फडणवीसांनी राजकीय शक्कल आणि केंद्रीय शक्तीच्या जोरावर पुन्हा अडीच वर्षात शिंदे-फडणवीस युती सरकारची स्थापना केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतरही फडणवीसांनी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

विश्वजित कदम यांचे सासरे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक एबीआयएल ग्रुपचे सर्वेसर्वा अविनाश भोसले आहेत. अविनाश भोसले सध्या गेल्या वर्षभरापासून ईडीच्या कोठडीत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात अविनाश भोसले यांच्यामागे इडीची पीडा लागली होती. 26 मे 2022 रोजी भोसले यांना इडीनं ताब्यात घेतलं होतं. आत्ताही भोसले तुरुंगातचं आहेत.

येस बॅंकेमधून डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी येस बॅंकेचे सहसंस्थापक राणा कपूर याच्याशी संगनमत करुन तीन हजार कोटी रुपयांचे कर्ज डीएचएफएलला दिले होते, मात्र त्यांना ते कर्ज फेडता आले नाही. त्यामुळं रेडियस ग्रुपचे संजय छाब्रिया यांना ती कंपनी विकली. रेडियस ग्रुपनं मुंबई उपनगरामध्ये सुमेर ग्रुपशी भागीदारीत असलेल्या एका प्रकल्पासाठी डीएचएफएलकडून तब्बल तीन हजार 94 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज व्याजासह थकित आहे. सीबीआयनं पुढे एप्रिल महिन्यात रेडियस ग्रुपचे संजय छाब्रीया यांना अटक केली. त्यानंतर सीबीआयनं पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यासह शाहिद बलवा आणि विनोद गोयंका यांच्याकडं आपला मोर्चा वळवत मुंबईत आणि पुण्यात छापेमारी केली होती. त्यानंतर सीबीआयनं अविनाश भोसले यांना ताब्यात घेतलं आहे.

आता या सर्व गोष्टींमुळं कॉंग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे आपल्या सासऱ्याला वाचवण्यासाठी भाजपात प्रवेश करणार का? कॉंग्रेसच्या हाताची साथ सोडणार का? हे पाहावं लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube