राज्यात आता पोलीस ठाणे वाढणार, नवे १८ हजार पोलीस पदे भरणार; फडणवीसांची घोषणा

राज्यात आता पोलीस ठाणे वाढणार, नवे १८ हजार पोलीस पदे भरणार; फडणवीसांची घोषणा

(प्रफुल्ल साळुंखे)

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची ( police) पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On police department Police stations will be increased 18 thousand new police posts will be filled)

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. कायदा सुव्यवस्था ढासळली आहे बाबत विरोधकांनी २९३ अंतर्गत कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्याची विनंती केली होती. यावेळी विरोधकांनी राज्यातले अनेक विषय समोर आणले होते. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले , “राज्यात पोलीस दलाचा नवा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. ६० वर्षात आज पर्यंत १९६० चा आकृतीबंध होता. लोकसंख्या वाढली तरी १९६० च्या लोकसंखेनुसार पोलीस स्टेशन आणि पोलिसांची संख्या होती. हे पाहता पोलीस स्टेशन वाढवणं, पद वाढवणे याबाबतचा अहवाल तयार करण्यात आला. हा अहवाल सरकार ने मान्य ही केला आहे. या अहवालानुसार किती लोकसंखेमागे एक पोलीस स्टेशन असेल? किती लोकांच्या मागे एक पोलीस असेल? हे निश्चित करण्यात आले आहे. यानुसार राज्यात १८ हजार पोलीस आणि अधिकारी लागणार असल्याचाी माहिती फडणवीसांनी दिली.

उत्तरप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा आना, आमदार प्रसाद लाड आक्रमक 

पुणे शहरात पोलिसांची संख्या कमी झाली म्हणून शासनाने कंत्राटी पोलीस घेतले आहेत. हे कर्मचारी सरकारच्याच महाराष्ट्र सुरक्षा मंडळाकडून घेण्यात आले आहेत. ही भरती कुठल्याही खाजगी ठेकेदारांकडून होणार नसल्याचे देखील देवेंद्र फडवणीस यांनी सांगितल. राज्यात पोलिसांची संख्या कमी असली तरी क्वीक रिस्पॉन्स टाईम ( गुन्हा घडल्यानंतर पोलीस दाखल होण्याची वेळ) आठ मिनटांवरून चार मिनिटांवर आली आहे. ही राज्यासाठी समाधानकारक बाब असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube