देवीच्या दर्शनासाठी आलेल्या मायलेकींचा धरणात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ
Doughter and Mother who came to see the goddess drowned in the dam : केद्राई देवीच्या (Kedrai Devi’s) दर्शनासाठी आलेल्या माय लेकींसोबत मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. चांदवड तालुक्यातील केद्राई देवीच्या दर्शनानंतर तेथील धरणाच्या काठाजवळ उभे असतांना पाय घसरून पडल्याने अवघ्या 7 वर्ष महिन्याच्या चिमुकलीसह तिच्या आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संबंधित कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची नोंद वडनेरवैभव पोलिस (Vadnervaibhav Police) ठाण्यात झाली असून अधिक तपास वडनेरभैरव पोलिस करत आहेत. तन्वी नीलेश देवकर (Tanvi Nilesh Deokar), अर्चना नीलेश देवकर अशी मृतांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी काल (दि. 14 एप्रिल) अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे काही लोक ओझर मधील श्री केद्राई माता मंदिरात नवसपूर्तीसाठी आले होते. यावेळी ज्या सात महिन्यांच्या मुलीबाबत नसव होता, ती तन्वी नीलेश देवकर आणि तिची आई अर्चना नीलेश देवकर यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यांनंतर त्या दोघी मायलेकी ह्या धरणाजवळ गेल्या. यावेळी आई अर्चना हिचा पाय घसरल्याने ती आपल्या चिमुरड्या मुलीसोबत धरणात पडली. आईला पोहता येत नसल्याने दोघींचाही पाण्यात बुडून करून अंत झाला. त्यानंतर आजूबाजूचे नागरिक त्या ठिकाणी आले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती.
सट्टेबाजीची जाहिरात करणे ब्रँडन मॅकलमच्या आले अंगलट; मुख्य कोच पद जाण्याची शक्यता
दरम्यान, या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांच्या मदतीने त्या दोघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहे. यावेळी आजूबाजूला बघ्यांची गर्दीही मोठी झाली होती. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तन्वीचा तिच्या आईसोबत बुडून मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी ही वयाने लहान असल्याने ती परिसरात अनेकांची लाडकी होती. त्यामुळं तिचा बुडून मृत्यू झाल्याने परिसरत अनेकांना धक्का बसला आहे.