उपचारासाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग; कडा येथील हॉस्पिटलमध्ये खळबळ

तरुणीच्या तक्रारीवरून डॉ. महेंद्र पटवा याच्याविरोधात आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 01T145751.190

कडा येथील पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी (Kada) आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉ. महेंद्र पटवा याच्याविरोधात आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे कडा परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित तरुणीला 29 ऑगस्ट रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने ती आई-वडिलांसोबत पटवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेली होती. प्राथमिक उपचार केल्यानंतर ती घरी परतली. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास पुन्हा त्रास जाणवू लागल्याने ती पालकांसोबत हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.

बीडच्या आष्टीत कृत्रिम दूध निर्मितीचा पर्दाफाश; 72 गोणी भेसळयुक्त पावडर जप्त, एकाला अटक

उपचार सुरू असताना डॉ. पटवा याने तरुणीला स्वतःच्या केबिनमध्ये बोलावले. तिच्या आईला बाहेर थांबण्यास सांगून डॉक्टरने अश्लील संवाद साधल्याचा तसेच तरुणीच्या इच्छेविरुद्ध स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तरुणीने विरोध केल्यानंतर हा प्रकार कुणाला सांगितल्यास बदनामी होईल, अशा स्वरूपाची धमकी दिल्याचेही तिने पोलिसांना सांगितले आहे.

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर घाबरलेल्या तरुणीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांसह तिने पोलिस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून डॉ. महेंद्र पटवा याच्याविरोधात आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

follow us