नागपूर : राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपुरमध्ये सुरू असून, यावेळी आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीला विशेष मुलाखत दिली. यावेळी धस यांनी बीडचं राजकारण आणि मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलंय. मंत्रिमंडळात संधी नाही मिळाली तरी खुशी आहे. संधी नाही मिळाली तरी लढेंगे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.