Shevgaon Taluka : पावसाची पाठ! शेवगाव तालुक्यावर दुष्काळाचे सावट… बळीराजा हतबल

Shevgaon Taluka : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण परिसरात अत्यंत भीषण

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Shevgaon Taluka

Shevgaon Taluka : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात गेल्या तब्बल तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण परिसरात अत्यंत भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा काळ सुरू असूनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतातील उभी पिके डोळ्यांसमोर करपून गेली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे.

पावसाअभावी विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमालीची खाली गेली असून पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. चारा आणि पाणीच उपलब्ध नसेल तर ही मुकी जनावरं जगवायची कशी?” असा हताश सवाल स्थानिक शेतकरी विचारत आहेत. दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारात जनावरांची विक्री करणेही अशक्य झाले असून, “जनावरे फुकट द्यायची वेळ आली तरी कोणी घ्यायला तयार नाही,” अशी विदारक व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या काही दिवसांवर बैलपोळ्याचा सण आला आहे. एरवी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेवगावच्या बाजारपेठेत मोठा उत्साह, खरेदी-विक्री आणि आर्थिक उलाढाल पाहायला मिळते. मात्र, यंदा दुष्काळाच्या सावटामुळे मुख्य बाजारपेठांमध्ये पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.

राज्य मंत्रिमंडळात 4 मोठे निर्णय; पुणेकरांना दिलासा

सर्जा-राजाच्या सणाचा उत्साह यंदा चिंतेच्या छायेत हरवला असून, शासनाने तातडीने या भागात दुष्काळ जाहीर करून छावण्या आणि चारा-पाण्याची व्यवस्था करावी, अशी आर्त हाक हतबल झालेला बळीराजा मारत आहे.

जॉर्ज कोवूर पार्ले बिस्किट्सचे नवीन सीईओ; आजपासून स्वीकारणार सूत्रे

follow us