हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; मराठवाड्यात भीतीचे वातावरण

Earthquake In Marathwada : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री

Earthquake In Marathwada

Earthquake In Marathwada : मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री 1.37 च्या आसपास भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर आली आहे. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली आहे. माहितीनुसार, हिंगोलीत शिंदे पांगरा गावात सर्वात आधी भूकंपाचे धक्के जाणवले. मध्यरात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे मराठवाड्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तर दुसरीकडे नांदेडमधील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड भागात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाची माहिती मिळताच प्रशासनाने मदतीसाठी धाव घेतली असून सध्या तरी या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. तर नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आहवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

इराण हादरले, तेहरानसह अनेक शहरांमध्ये अमेरिकेचे हल्ले; एकाचा मृत्यू

माहितीनुसार,  नांदेडमध्ये 4.2 रिश्टल स्केल भूकंपाच्या धक्क्याची नोंद करण्यात आली तर भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमतजवळ होते. मध्यरात्री 1.37 ते 3.23 दरम्यान भूकंपाचे 4 धक्के जाणवले.  हिंगोली जिल्ह्यात गेल्या सहा वर्षात 37 पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जिल्ह्यात मध्यरात्री आलेल्या भूकंपाच्या चार धक्क्यांमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

मिथुनसह पाच राशींना होणार आर्थिक लाभ; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार 

follow us