Big Breaking : छ. संभाजीनगरमध्ये ईडीची 9 ठिकाणी छापेमारी; शहरात खळबळ

  • Written By: Published:
Big Breaking : छ. संभाजीनगरमध्ये ईडीची 9 ठिकाणी छापेमारी; शहरात खळबळ

ED Raid In Chatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये ईडीने (ED) नऊ ठिकाणी छापेमारी केल्याचे सांगितले जात आहे. एकाचवेळी अनेक ठिकाणी ही छापेमारी केली जात असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.

Pune-Mumbai द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, तिघांचा दुर्दैवी मृत्यू

या घोटाळ्याप्रकरणी शहरातील सिटी चौक पोलीस ठाण्यात 16 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, ई निविदा प्रकरणातील अटींचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. महापालिकेची फसवणूक केल्याचा आरोप वरील सर्वांवर ठेवण्यात आला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात ईडीकडून सकाळपासून नऊ ठिकाणी छापेमारी केली जात आहे. एकाचवेळी नऊ ठिकाणी छापेमारी केली जात असल्याने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

नेमकं प्रकरण काय?
शहरात पंतप्रधान आवाज योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. या अंतर्गत 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचे काम देण्यासाठी ही निविदा काढण्यात आली होती. यात रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी निविदा दाखल केली होती. परंतु, दोन्ही कंपन्यांनी एकाच आयपीवरून ही निविदा दाखल केल्याचे समोर आले. असे करणे नियमांचा भंग करण्यासारखे आहे. त्यानंतर आता या प्रकरणात ईडीने छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube