कर्नाटकात बंडखोरांचा दारुण पराभव; इकडं शिंदे गटाची धाकधूक वाढली

कर्नाटकात बंडखोरांचा दारुण पराभव; इकडं शिंदे गटाची धाकधूक वाढली

Ekanath Shinde MLA Group :   कर्नाटक राज्याच्या विधानसभेचा निकाल नुकताचं लागला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले असून भाजपचा पराभव झाला आहे. ही निवडणुक भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. दोन्ही पक्षाने या निवडणुकीत आपल्या दिग्गज नेत्यांना प्रचारासाठी उतरवले होते. पण यावेळी जनतेने भाजपला साफ नाकारले व काँग्रेसच्या पारड्यचात विजय टाकला आहे.

या निवडणुकीत हिजाब, हलाल, बजरंगबली असे अनेक मुद्दे चर्चेला आले होते. पण या व्यतिरिक्त बंडखोर 17 आमदारांची देखील तितकीच चर्चा या निवडणुकीत होती. 2018 साली झालेल्य़ा निवडणुकीत २२४ पैकी १०४ जागा मिळवल्या. मात्र बहुमताच्या ११३ या आकड्यापासून भाजपा दूर होते. काँग्रेसने या निवडणुकीत ७६, तर जेडीएसने ३७ जागा जिंकल्या होत्या. इतर अपक्ष आमदारांसह ११६ आमदारांच्या पाठिंब्यावर जेडीएस-काँग्रेसने सरकार स्थापन केले.

Kishor Aware Murder Case : गुन्हा दाखल होताच रोहित पवार सुनील शेळकेंच्या भेटीला

जेडीएस-भाजपाने एकत्र येऊन सत्ता स्थापन केले. बंडखोरी करून पोटनिवडणुकीला सामोरे गेलेल्या काही आमदारांना भाजपाने मंत्रिपद देऊ केले, काहींना दिल्लीत वर्णी लावली तर काहींची उमेदवारी डावलण्यात आली. सन २०१९ साली भाजपाने ऑपरेशन लोटस राबवून दोन्ही पक्षांचे १७ आमदार फोडले.

कर्नाटकात राष्ट्रवादी तोंडावर आपटली; 5 उमेदवारांना दोनशेच्या आत मतं

या आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे तत्कालीन जेडीएस-काँग्रेसचे सरकार पाडले होते. भाजपाने दोन्ही पक्ष आणि एक अपक्ष मिळून १७ आमदार फोडले होते. या १७ पैकी दोन आमदारांनी या वेळी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. एका आमदाराने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र त्यांचा पराभव झाला.  उर्वरित १४ आमदारांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र यापैकी आठ जणांचा पराभव झाला असून फक्त सहा आमदारांना आपला मतदारसंघ राखता आला आहे.

या निकालामुळे आता राज्यातील शिंदे गटाच्या आमदारांचादेखील अशाच प्रकारे पराभव होणार का?, याविषयी चर्चा सुरु झाली आहे. राज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. त्यात 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर त्यांना निवडणुक लढवता येणार नाही. सध्या हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आलेला आहे.

उपमुख्यमंत्री अन् 5 मंत्रीपद द्या, सुन्नी वक्फ बोर्डाची काँग्रेसकडे मागणी

शिंदे गटावर ठाकरे गट व इतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून गद्दार असा आरोप करण्यात येतो आहे. 50 खोके एकदम ओके अशी घोषणा देत शिंदे गटाला टारगेट केले जात आहे. त्यामुळे याचा परिणाम 2024 सालच्या विधानसभेत दिसणार का याची चर्चा आता सुरु झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे धाबे दणाणले असल्याचे ठाकरे गटाकडून बोलले जात आहे. एकंदरीत आगामी विधानसभेत या आमदारांचे काय होते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube