एकनाथ शिंदेंच्या घरी चोरी…शायना एनसी यांचा मोबाईल गायब, पोलिसांत गुन्हा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातून शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांचा मोबाईल गायब झाल्याची घटना घडलीयं.

Shayna Nc

Eknath Shinde Nandanvan : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नंदनवन शासकीय निवासस्थानी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एनसी यांचा मोबाईल चोरीला गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी शायना एनसी आल्या होत्या. राज्यातील इतर बड्या नेत्यांसोबत गप्पा सुरु असतानाच दोन मिनिटांसाठी हातातून बाजूला ठेवलेला मोबाईल अचानक गायब झाला. या प्रकरणी शायना एनसी यांनी पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दिली आहे.

मोठी बातमी : निवृत्त अधिकारी दिलीप खेडकरसह पत्नीविरुद्ध एसीबीचा गुन्हा; तेरा कोटींची बेहिशोबी मालमत्ता आढळली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी शायना एनसी यांनी आपला मोबाईल बाजूला ठेवला होता. दर्शनानंतर त्यांनी मोबाईल पाहिला तर गायब झाला. बराच वेळ सर्वांनीच मोबाईलची शोधाशोध केली परंतू मोबाईल काही मिळेना. यावेळी एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले. या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवली. तपासादरम्यान शायना यांचा मोबाईल नंदनवन येथे कर्मचाऱ्याकडे मिळून आला. नजरचुकीने मोबाईल आपल्याकडे आल्याची कबुली कर्मचाऱ्याने दिली. मोबाईल सुपूर्द करण्यासाठी पोलिसांकडे जात असल्याची माहिती या कर्मचाऱ्याने दिली आहे.

बारामतीतील दुहेरी हत्येने खळबळ; ‘वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणा’, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान, पोलिसांनी चौकशीमध्ये विसंगती आढळून आलेली नाही. या व्यक्तीवर पोलिसांनी कारवाई न करता दाखल गुन्ह्याबाबत न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी न्यायालयाने संबंधित मोबाईल शायना एसी यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत.

follow us