Eknath Shinde : शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर अजित पवार काय देतात? मुख्यमंत्री शिंदेंचा खोचक टोला

Untitled Design   2023 04 08T182413.499

Eknath Shinde on Ayodhya Tours : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या आमदारांसह आज अयोध्या दौऱ्यावर (Ayodhya Tours) जाणार आहे. शिंदे गटाच्या या अयोध्यादौऱ्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठविली आहे. दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राम लल्लाचे दर्शन घ्यायला जाण्यावरूही विरोधक राजकारण करू लागले आहे. विरोधी पक्षातील लोकांना काय कराव आणि काय करू नये, हे देखील सुचत नाही आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली, आता फक्त टीका करणं एवढच काम त्यांच्याकडे आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली. मी विरोधकांवर टीका करणार नाही, मी कामातून त्यांना उत्तर देईल, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे विरोधकांच्या टीकेला उत्तर देतांना म्हणाले की, प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यायला आम्ही जात आहोत. त्यालाही विरोधक विरोध करत आहेत. याचं कारण म्हणजे, शिंदे-फडणवीस सरकारने गेल्या 9 महिन्यात कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. कुठलाही समाज घटक वंचित ठेवला नाही. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून टीका करणं एवढचं काम त्यांच्याकडे उरलं आहे. मी त्यांना टीकेतून उत्तर देणार नाही. कामातून उत्तर देणार आहे, असं ते म्हणाले.

Covid 19 : सावधान! कोरोनानंतर भारतीयांना होत आहेत ‘हे’ आजार

मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावरही टीकेचे बाण सोडले. ते म्हणाले की, एक मात्र, नक्की आहे की, आता सगळे कामाला लागलेले दिसत आहेत. पूर्वी जे कुठं दिसत नव्हते, ते लोक देखील आता रस्त्यांवर उतरूल लोकांना भेटू लागले आहेत. ही चांगली बाब आहे. परिवर्तन झालं आहे, काही लोक बरे झाले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर निशाणा साधला होता. आता कलियुग चालू आहे. रावण राज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण आम्ही पुन्हा एकदा राज्यात राम राज्य आणू, असं म्हणतं शिंदे गटावर टीका केली होती. याविषयी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून मी काम करत आहे, अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार यांनीही अयोध्या दौऱ्यावरून शिंदे गटावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगिलतं की, शेतकऱ्यांनी पाणी मागितल्यावर अजित पवार काय देतात? मला परत जुन्या इतिहासात जायाला लावू नये. अयोध्या हा आमच्या अस्मितेचा आणि श्रध्देचा विषय आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून ते धर्मवीर आनंद दिघेंपर्यंत हा आमचा श्रध्देचा विषय आहे. अयोध्येशी आमचं एक नातं आहे. कारसेवेमध्ये सोन्याची वीट दिघे साहेबांनी दिली होती.

यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. अयोध्येला मंदिर व्हावं, ही सर्वसामान्य लोकांची अपेक्षा होती. आणि पंतप्रधान मोदींनी अतिशय भव्य असं आंतरराष्ट्रीय ख्यातीचं राम मंदिर बांधत आहे. कोट्यावधी लोकांचं स्वप्न पूर्ण करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube