मतदानाच्या दिवशीही तांबेंच्या बालेकिल्ल्यात शुभांगी पाटलांचा..,
अहमदनगर : संगमनेरमधील मतदान केंद्रावर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) रोखल्याचं दिसून आलंय. शुभांगी पाटील यांच्यावर मतदान केंद्रावर प्रचार करत आरोप ठेऊन त्यांना मतदान केंद्रावर निवडणूक अधिकाऱ्यांकडून रोखण्यात आलंय. दरम्यान, शुभांगी पाटील सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बालेकिल्ल्यातच आपला प्रचार करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर त्यांना मतदान केंद्रावर रोखण्यात आल्याचं दिसून आलंय.
नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. शुभांगी पाटील संगमनेरमधील मतदान केंद्रावर आल्या असता त्यांनी मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना हात जोडून, आपल्याला मतदान करा, असं आवाहन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
मात्र, मी सर्वसामान्य जनतेतून असून सामान्य जनता दिसल्यानंतर मी सामान्य जनतेला हात जोडत असल्याचं स्पष्टीकरण शुभांगी पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील आणि काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करुन आपल्या उमदेवारीचा अपक्ष अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे यांच्यात चुरशीची लढत होत असल्याचं दिसून येतंय.
या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं असून शुभांगी पाटील यांनी मतदान सुरु असताना मतदान केंद्रावर मतदारांना हात जोडल्याने पाटील यांना मतदान केंद्रावर रोखण्यात आलं आहे. मतदानावेळी शुभांगी पाटील मतदारांना हात जोडून मतदान करण्याची करत असल्याने त्यांच्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
दरम्यान, वेगवेगळ्या घडामोडींमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघ राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेसशी बंडखोरी करत सुधीर तांबेंनी सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज दाखल केल्याचं दिसून आलंय. तर भाजपने या मतदारसंघात आपला उमदेवार न देता भाजपकडून सत्यजित तांबेंना पाठिंबा दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
तर दुसरीकडे सुधीर तांबेंनी काँग्रेस पक्षाशी दगाफटका केल्याने महाविकास आघाडीच्यावतीने अपक्ष उमदेवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात नाशिक पदवीधर निवडणुकीकडे लक्ष लागून राहिलंय.