ओमराजे ते संजय जाधव बंडखोर खासदारांची पोलखोल! विकास निधीची तक्रार पण आतापर्यंत मंजूर निधी खर्चच केला नाही

Exposing UBT rebel MP खासदारांकडून पक्ष सोडण्याची जी काही कारणं देण्यात आली. त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Exposing UBT Rebel MP

Exposing UBT rebel MPs Complaints of development funds yet sanctioned funds remain unspent : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर गेले 2-3 दिवस राज्यामध्ये राजकीय नाट्य सुरू होतं. या नाट्यावर आज अखेर पडदा पडला आहे. कारण 22 जून 2026 रोजी अखेर ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र जेव्हा पासून या ऑपरेशनची चर्चा आहे. तेव्हापासून या बंडखोर खासदारांकडून पक्ष सोडण्याचं एकच कारण दिलं जात आहे. ते म्हणजे विरोधी पक्षातील असल्यामुळे त्यांना केंद्र सरकारचा निधी मिळत नाही. त्यामुळे ते खासदार पदावर असूनही लोकांची विकास कामं करता येत नाही. त्यामुळे आम्ही विकास काम करण्यासाठी पक्ष सोडून शिंदे गटात जात आहोत.

भांडण सोडवण जीवावर बेदल; बीड जिल्ह्यात हॉटेल मालकाचा चाकू भोकसून खून

मात्र यानंतर या खासदारांकडून पक्ष सोडण्याची जी काही निधी न मिळणे, विकास कामं न होणे कारणं देण्यात आली. त्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे या खासदारांची थेट पोल खोल झाली आहे. कारण या खासदारांनी मिळालेला निधी देखील खर्च केलेला नाही. पक्ष सोडताना मात्र निधी न मिळणे, विकास कामं न होणे ही कारणं दिली आहेत. जी धादांत खोटी असल्याचं या खासदारांना आतापर्यंत मिळालेला निधी आणि त्यातून त्यांनी खर्च केलेल्या निधीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

कोणत्या खासदारांनी सोडली ठाकरेंची साथ?

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर त्यांनी 22 जून 2026 रोजी अखेर ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांनी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामध्ये संजय जाधव, संजय पाटील, नागेश बापूराव आष्टीकर, ओमप्रकाश राजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय देशमुख यांचा समावेश आहे.

सहा खासदारांच्या विकास निधीचा आढावा; मंजूर रक्कम, खर्च आणि कामांची स्थिती काय?

1. भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 14.70 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 71 लाख रुपये
मंजूर कामे : 135
पूर्ण झालेली कामे : 2
शिल्लक निधी : 13.98 कोटी रुपये

2. संजय जाधव (परभणी लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 14.70 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 3.78 कोटी रुपये
मंजूर कामे : 56
पूर्ण झालेली कामे : 25
शिल्लक निधी : 10.91 कोटी रुपये

3. नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 19.02 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 5.02 कोटी रुपये
मंजूर कामे : 79
पूर्ण झालेली कामे : 28
शिल्लक निधी : 13.95 कोटी रुपये

4. संजय देशमुख (वाशिम लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 18.60 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 1.41 कोटी रुपये
मंजूर कामे : 106
पूर्ण झालेली कामे : 7
शिल्लक निधी : 17.14 कोटी रुपये

5. ओमराजे निंबाळकर (धाराशिव लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 18.47 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 1.97 कोटी रुपये
मंजूर कामे : 130
पूर्ण झालेली कामे : 21
शिल्लक निधी : 16.49 कोटी रुपये

6. संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ)

मंजूर निधी : 14.70 कोटी रुपये
खर्च झालेला निधी : 15.59 लाख रुपये
मंजूर कामे : 40
पूर्ण झालेली कामे : एकही नाही
शिल्लक निधी : 14.54 कोटी रुपये

 

follow us