​डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील आर्किटेक्चर महाविद्यालय येथे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम संपन्न

सहभागी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाच्या बदलत्या गरजा, व्यावसायिक कौशल्यांशी शैक्षणिक पद्धतीची सांगड घालण्याबाबत दृष्टिकोन मिळाला.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 09 23T173329.291

Faculty Development Program Concluded : डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी, पुणे आणि काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर – ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (COA-TRC), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “Connect the Disconnect: Industry Responsive Architectural Education” या विषयावर पाच दिवसीय ऑनलाइन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. 7 ते दि. 11 सप्टेंबर 2026 रोजी यशस्वीरीत्या करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदनेने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी संयोजिका प्रा. जयश्री देशपांडे आणि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. छाया तिरविर यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे, स्वरूप आणि पाच दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा यांची संक्षिप्त माहिती उपस्थित सहभागी शिक्षकांना दिली. वास्तुशास्त्र शिक्षण आणि व्यावसायिक क्षेत्रातील दुवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात नवीन अध्यापन पद्धती, Outcome-Based Education (OBE), उद्योगाभिमुख शिक्षण, प्रभावी मूल्यमापन, AI व Computational Design, संशोधन, शाश्वत वास्तुशास्त्रीय पद्धती आणि आंतरशाखीय रचना व समस्या निराकरण यांसारख्या अनेक समकालीन विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांना घाबरता तर दौरे रद्द करा…मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा

​विविध क्षेत्रातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, वास्तुविशारद आणि व्यावसायिकांनी घेतलेल्या या सत्रांमधून सहभागी शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञान, उद्योगाच्या बदलत्या गरजा आणि व्यावसायिक कौशल्यांशी शैक्षणिक पद्धतीची सांगड घालण्याबाबत महत्त्वपूर्ण दृष्टिकोन मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन काउन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष प्रा. किरण एस. महाजनी आणि COA-TRC, पुण्याच्या संचालक व संयोजिका प्रा. जयश्री देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. डॉ. छाया तिरविर यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून, प्रा. सीमंतीनी नाकील आणि प्रा. पूजा गाढिले यांनी सह-समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली.

​COA-TRC फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, आकुर्डी कॅम्पसचे अध्यक्ष सतेज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, संचालक (ऑपरेशनस्) स्नेहा तेजस पाटील, डॉ. डी. वाय. पाटील एज्युकेशनल कॉम्प्लेक्सचे कॅम्पस संचालक रियर एडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

follow us