नाशिकमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात, दहा प्रवाशांचा मृत्यू

नाशिकमध्ये बस-ट्रकचा भीषण अपघात, दहा प्रवाशांचा मृत्यू

नाशिक : नाशिकच्या सिन्नर-शिर्डी महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ बस आणि ट्रकची धडक होऊन हा अपघात झाला. अपघातात मृत्यू झालेल्यांच्या संख्येचा अधिकृत आकड्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहित मिळत आहे.

हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात बस आणि ट्रकचा चक्काचूर झाल्याचं दिसून येतंय. मुंबईहुन शिर्डीकडे जाणारी बस आणि शिर्डीकडून सिन्नरला जाणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या खासगी बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते. तर ठाण्यातील उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. त्यातील एका बसला हा भीषण अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातात बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, या अपघातात जखमी झालेल्या जखमींवर नाशिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनूसार अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात घडल्यानंतर वावी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास सुरु आहे.

अंबरनाथ, ठाणे, उल्हासनगर परिसरातून काही भाविक शिर्डीला दर्शनासाठी जात होते. दर्शनाला जात असतानाच हा अपघात घडला. मुंबई येथून शिर्डी कडे जाणारी खाजगी आराम बस क्रमांक एम एच ०४ एसके २७५१ व शिर्डी कडून सिन्नर बाजूकडे जाणारा मालट्रक क्रमांक एम एच ४८टी १२९५ यांची समोरासमोर धडक होऊन आपघात झाला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू असल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube