तुकाराम मुंढेंच्या FDA चा राज्यभरात कारवाईचा धडाका! 2.23 कोटींचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित

FDA Action Tukaram Mundhe: FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे.

FDA Action Tukaram Mundhe

FDA Action Tukaram Mundhe: राज्यात भेसळयुक्त आणि नियमबाह्य अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईचा वेग वाढवला आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या निर्देशानुसार राज्यभरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत तब्बल 2.23 कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तसेच 23 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 8 विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्यात आले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘जिजाई’ चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा, नव्या पोस्टरचे अनावरण

भिवंडीत 2.06 कोटींचा अन्नसाठा जप्त

मुंबई आणि ठाणे परिसरात FDA ने केलेल्या तपासणीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भिवंडी येथील मे. डीएक्सपी व्हेंचर्स इंडिया प्रा. लि. या कंपनीकडून आयात केलेल्या अन्नपदार्थांवरील उत्पादन तारीख, मुदत संपण्याची तारीख आणि कमाल किरकोळ किंमत (MRP) थिनरच्या मदतीने पुसून त्यावर पुन्हा छपाई केली जात असल्याचे आढळले. या प्रकरणी प्रशासनाने 2.06 कोटी रुपयांचा अन्नसाठा जप्त केला आहे.

पुण्यातील खाऊ गल्लीतही कारवाई

पुण्यातील जे. एम. रोडवरील खाऊ गल्लीतही FDA ने तपासणी केली. यावेळी 8 विक्रेते कोणतीही नोंदणी न करता व्यवसाय करत असल्याचे आढळले. या विक्रेत्यांचे व्यवसाय बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 2.40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय पुण्यात 10 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

दुष्काळाच्या झळा! फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, उद्याने, सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक

मुंबईतील नामांकित आस्थापनांवर कारवाई

मुंबईत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 6 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये पुढील आस्थापनांचा समावेश आहे.

1. मे. सानिजा हॉटेल्स प्रा. लि. (5 Spice, QIN’s), वांद्रे पश्चिम
2. मे. मोनार्क लिबर्टी वर्ल्ड वाइड हॉस्पिटॅलिटी एलएलपी (EVE), सांताक्रूझ पश्चिम
3. मे. ड्रोगेरिया सेलर्स प्रा. लि., ससून डॉक, कुलाबा
4. मे. अन्नदाता कॅफे, कुलाबा
5. मे. चायोस (सनशाईन टीहाऊस प्रा. लि.), चर्चगेट
6. मे. ब्लिंक कॉमर्स प्रा. लि., फोर्ट

राहुरीत स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; 11 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त, 3 जणांवर गुन्हा दाखल

या आस्थापनांमध्ये तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे आढळले. त्यामुळे अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 आणि संबंधित नियमांनुसार परवाने निलंबित करण्यात आले आहेत. निलंबनाच्या काळात या आस्थापनांना अन्नपदार्थांची खरेदी, विक्री किंवा वितरण करता येणार नाही.

पंढरपूरसह राज्यातील इतर भागांतही तपासणी

कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये 54 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. याशिवाय बृहन्मुंबई विभागातील 6, नागपूर विभागातील 1, नाशिक विभागातील 1 आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 1 आस्थापनाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

दरम्यान, ठाणे, रायगड आणि पुणे परिसरात चहा मिक्स, तूप आणि जेलीपॉपचा सुमारे 68,094 रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या मोहिमेमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्न विक्रेत्यांवर FDA ची कारवाई सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

follow us