आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T135513.872

FIR Against Sujit Patakar : आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्याविरोधात पुण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पुणे जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचरलणसाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार करून निविदा मंजूर करून घेतल्याप्रकरणी  सुजित पाटकर यांच्यासह चौघांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यानंतर  डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर ,संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पीएमआरडीएचे अभियंता राजू लक्ष्मण ठाणगे यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम 420, 426, 465, 467 ,468, 471, 511 ,34 नुसार गुन्हा दाखल केलेला आहे.

…नाव घेतलं नव्हतं, कोणाच्या अंगाला का लागावं, अजित पवारांचा राऊतांना टोला

ही घटना 26/8/ 2020 ते 9 /9 /2020 यादरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण सयाजीराव गायकवाड भवन, पुणे आणि जम्बो कोविड सेंटर सीओपी ग्राउंड शिवाजीनगर पुणे याठिकाणी घडलेली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या फर्मल जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार केले होते.

सुषमा अंधारेंना नरेश म्हस्केंचे खुले आव्हान, आरोप सिद्ध करा नाहीतर….

सदरची निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने पुढील तपास करत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube