आधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करा, कांदाप्रश्नी अंबादास दानवे आक्रमक
मुंबई : राज्यातील कांदा (Onion Price), कापूस (Cotton Price)उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. यावेळी त्यांनी 289 अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली.
बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक दिल्याची बाब दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. पाकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कीस्तान, नेदरलँड आदी देशांत व आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यामुळं शेतावर नांगर फिरवत आहे. त्यामुळं कांदा निर्यात करण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी व नाफेडमार्फत कांदा खरेदी करावा, अशी मागणी दानवे यांनी केली.
Bhaskar Jadhav : देवेंद्र फडणवीस अनाजीपंत, मोहित कंबोज हा देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव कुत्रा
अमरावतीत सोमवारी शेतकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज प्रकरण ही दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणला.सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप दानवे यांनी करत शेतकरी गुन्हेगार, दहशतवादी आहेत का? त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातोय असा सवाल उपस्थित केला.
ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करून सरकार राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. 12 ते 14 हजार कापसाला भाव मिळत होता, मात्र आता 7 ते 7.5 हजार इतका भाव खाली आलाय. कापसाला हमी भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी घरात कापूस साठवून ठेवला, मात्र आता त्यामुळं शेतकऱ्यांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं.
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कांद्याची स्थिती योग्य असल्याचं मान्य केलं. नाफेडमार्फत कोणत्याही अटी व शर्तीशिवाय कांदा खरेदी केला जाईल व याबाबत केंद्र सरकारकडं चर्चा केली जाईल, असं त्यांनी सांगितलंय.