हे ठरवणारे राज ठाकरे कोण?, आमदार, खासदार अन् अधिकाऱ्यांची पोरं म्हणत बच्चू कडू भडकले

Maharashtra language politics : राज्यात सध्या मराठी-विरुद्ध हिंदी असा वाद उभा राहिला आहे. यामध्ये राज ठाकरे यांनी थेट भूमिका घेतल्याने या विषयाला राजकीय वळण लागलं आहे. यामध्ये आता माजी आमदार बच्चु कडू यांनी उडी घेतली आहे. ते मनसेच्या विरोधावर कडाडले असून, राज ठाकरे ठरवणारे कोण? (language)असा सवालच त्यांनी आता उपस्थित केला आहे.
बच्चू कडू यांनी आमदार, “खासदार, अधिकाऱ्यांची पोरं दहा-दहा भाषा शिकतात. गरिबाच्या पोराला शिकवण्यासाठी काय अडचण आहे? तो त्यांच्या पालकांचा विषय आहे, त्यांनी पाल्याला काय शिकवायचे अन् काय नाही ते. भाषा शिकल्याने मराठी अस्मिता जाती, असं काही नाही. आम्ही नेहमी मराठी भाषा वापरली पाहिजे, याच्याबद्दल दुमत नाही, असंही बच्चू कडू यांनी म्हटले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलताना, बच्चू कडू यांनी कर्जमाफीचा विषय हा मुख्यमंत्र्याकडं घेऊन जाणार आहोत, असं सांगितलं. आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत, कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मानसिकता आहे, असं मंत्री माणिकराव कोकाटे म्हणत आहेत, मग घोड अडलं कुठे? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; ठाकरेंनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
तुम्ही घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, त्यामुळे व्याज माफ झालं नाही. आता नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तुम्ही घोषणा केली नसती, तर त्यांनी कर्ज भरलं असतं, तुम्ही घोषणा केल्यामुळे ते आता कर्ज भरत नाहीत. आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, यासाठी काही झालं तरी बहेत्तर, असा इशारा बच्चू कडू यांनी महायुती सरकारला दिला.
मनसेने महाराष्ट्रातील व्यावसायिक दुकानदारांच्या पाट्या या मराठी पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. अर्थात, सर्वोच्च न्यायालयाचा यासाठी मोठा संदर्भ आहे. त्यावर बच्चू कडू यांनी पाट्या मराठीत लावल्या पाहिजेत, त्याबद्दल दुमत नाही. पण काय शिकावं हे राज ठाकरे कसं काय ठरवणार, असा सवालही त्यांनी केला आहे.
शाळेत जर्मनी भाषा शिकली म्हणून त्याचं कौतुक होतं. मात्र, हिंदी शिकवते म्हणून त्याच्यावर तुम्ही प्रश्न निर्माण करत असाल. तर हे चुकीच आहे. हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून घोषित केलं पाहिजे, आम्ही जेव्हा महाराष्ट्रात आहे, तेव्हा मराठी आहे, असे सांगून देशाला एक नाव नाही, भारत वेगळा, इंडिया वेगळा, हिंदुस्तान वेगळा, काय प्रकार लावलाय? याकडं बच्चू कडू यांनी लक्ष वेधलं आहे.