तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; ठाकरेंनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं

तुम्ही हिंदी घ्या, आम्ही मराठीची बाजू घेतो; ठाकरेंनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं

MLA Aaditya Thackeray : बिहारचं इलेक्शन येतंय, तुम्ही हिंदी घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो, असंच काहीसं राजकारण झालं असावं असं भाकीत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (MLA Aaditya Thackeray) यांनी केलंय. दरम्यान, राज्यात नव्या शैक्षणिक धोरणानूसार राज्यात पहिलीपासू हिंदी भाषेची सक्ती करण्यात येत आहे. या सक्तीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवल्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाकडूनही विरोध केला जात आहे. या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारला चांगलच धारेवर धरलंय.

सावधान! पालकांच्या इच्छेविरुद्ध लग्न करताय मग, पोलीस संरक्षण नाहीच; हायकोर्टाचा निकाल

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राजकारण बघायचे असेल तर योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या, पाठिंबा, विरोधाची चर्चा झाली. कदाचित बिहार इलेक्शन येणार आहेत, यात तुम्ही हिंदी भाषा घ्या आणि आम्ही मराठीची बाजू घेतो असे काहीतरी झाले असेल, असा राजकीय कयास बांधून राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असल्याचं ठाकरे म्हणाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या एकजुटीला यश! आंदोलनानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय अखेर झालाच

तसेच जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तितकी तुमची प्रगती होते, युपीएससीमध्ये पण स्थानिक भाषा बोलणारे असतात. आपली आताची जी शिक्षण पद्धती आहे, त्यात मुंबई महापालिकेत मराठी, हिंदी, इंग्लिश, अशा अनेक भाषा शिकवतो, पण त्यात मराठी सक्तीची होती. पहिली पासून शिकवताना 3 भाषा ही मुलांवर जरा जास्त सक्ती आहे असे वाटत नाही का? त्यापेक्षा हळू हळू ती शिकवायला सुरुवात करावी, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.

वक्फ बोर्ड कायदा जैसे थे! सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्राला धक्का, सात दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

जेवढ्या जास्त भाषा येतात तेवढं चांगलं आहे. मराठी सक्ती गरजेचीचं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत अनेक भाषा आहेत 9 भाषामधून आपण शिकतो. आमचं सरकार असताना एक सक्ती केली होती की मराठी भाषा केली होती. भाषेच्या सक्तीचा विद्यार्थ्यांवर किती दबाव टाकणार आहात. मंत्र्यानी हे परिपत्रक काढलेले त्यांना एक तरी भाषा व्यव्यस्थित येणार आहे का? शिक्षकांवर किती दबाव पडणार आहे त्याच काय नियोजन केल जाणार आहे का? असा सवालही ठाकरे यांनी केलायं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube