महाझुठी सरकारचे पहिले १०० दिवस कसे होते?, निर्धार शिबीरातून आदित्य ठाकरेंनी पाढाच वाचला

Shiv Sena UBT Camp In Nashik : कचऱ्याचा प्रॉब्लेम असेल, मुंबईत रस्त्याचा घोटाळा असेल, पाणी टंचाई असेल या सगळ्या गोष्टींवर बोलत असताना मला एक गोष्ट जाणवली की, प्रत्येक जिल्ह्यात, विभागात असं शिबीर होणं गरजेच आहे. (Nashik) आज आपल्याला वाटचाल कशी करणार आहोत, त्यासाठी दिशा, रोडमॅप ठरवायचा आहे. शहरावर, जिल्ह्यावर बोलण तसं सोपं असतं, कारण स्थानिक विषयांची माहिती असते असं आदित्य ठाकरे म्हणाले. नाशिकमध्ये आज उद्धव ठाकरे गटाचं निर्धार शिबीर सुरु आहे. त्यामध्ये ते बोलत होते.
त्याचं कौतुक होतं
कुठलही सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिले 100 दिवस हनीमून पीरियड असतो. या काळात मुख्यमंत्री जे काही करतात, त्याचं कौतुक होतं. या महाझुठी सरकारचे पहिले 100 दिवस कसे होते? एकतरी चांगली योजना आणली का? निवडणूक आयोगाच्या आशिर्वादामुळे बसलेल्या या सरकारने शेतकऱ्यांसाठी 100 दिवसात एकतरी चांगली योजना आणली का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
ठाकरेंना धक्का, माजी आमदार संजय घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश
आज जेव्हा मला नाशिकला यायचं होतं, तेव्हा मी राऊतसाहेबांना फोन केला. संजयकाका उद्या बोलायचं काय? मला विषय काय दिलाय? ते लगेच बोलले, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या विषयावर बोलं. प्रश्न हाच आहे की, महाराष्ट्र चाललाय तरी कुठे? या सरकारला 100 दिवस उलटून गेले आहेत असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दौऱ्यावर निघून जायचो
लहानपणापासून राजकारणाची आवड होती. 7 ते 10 वर्षाचा असल्यापासून हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माझे वडिल उद्धव ठाकरे यांच्यासोबत गाडीत, विमानात बसून दौऱ्यावर निघून जायचो. एकदा 10 वी परीक्षेच्या चार दिवस आधी वडिलांसोबत श्रीवर्धन दौऱ्यावर गेलो होतो अशी आठवण आदित्य ठाकरे यांनी सांगितली.