व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात

Pune News : ग्राहक विश्वासाच्या बळावर पुणे बांधकाम क्षेत्रात गुणवत्तापूर्ण निवासी व व्यावसायिक प्रकल्पांच्या उभारणीत वेगळी व ठळक ओळख मिळवण्यात यशस्वी झालेल्या श्री व्यंकटेश बिल्डकॉनच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या विविध उपक्रमांना काल उल्हासपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त 14 फेब्रुवारी रोजी व्यंकटेश एरंडवणे सेंट्रल येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी आमदार कुमारभाऊ गोसावी यांच्या हस्ते झाले. यावेळी अॅड. उन्मेश देशपांडे, लहुराज आसबे, हेमंत गोसावी, श्री व्यंकटेश बिल्डकॉनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अंकुश आसबे, शुभांगी आसबे, पियुषा आसबे आणि अमित मोडगी आदी उपस्थित होते.
शिबिरात अहिल्या हेल्थ हेल्पलाइन आणि सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनचे डॉ. रोहित बोरकर यांच्या सहकार्याने विविध तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली. अनेकांनी या तपासणीचा कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.
मराठी साहित्ययात्री संमेलनाचा दिमाखात शुभारंभ! ढोल-ताशांच्या गजरात दुमदुमले रेल्वेस्थानक
आरोग्य उत्तम असेल तर घर ही उल्हास आणि ऊर्जेने परिपूर्ण राहतं. रियल इस्टेट सेक्टरमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यंकटेश बिल्डकॉनसाठी केवळ उत्तम घरे बांधणेच नव्हे, तर आपल्या कर्मचाऱ्यांचे आणि कामगारांचे आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी प्रत्येकाला सुरक्षित, आनंदमयी आणि स्वस्थ वातावरण मिळावे, यावर कंपनीचा नेहमीच भर राहिला आहे. असे मत आसबे यांनी व्यक्त केले.
14 फेब्रुवारीपासून 22 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या वर्धापनदिन सोहळ्यात दररोज वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. अशा प्रकारच्या विविध उपक्रमांमधून व्यंकटेश बिल्डकॉन कायमच आपली सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे. विशेष म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने 19 फेब्रुवारीपासून व्यंकटेश बिल्डकॉन तर्फे विशेष ऑफर्स ही मर्यादित कालावधीसाठी देण्यात येत आहेत.