पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अटकेत, 920 ग्रॅम अमली पदार्थांसह 28 लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीच्या घरातून तब्बल 28 लाख रुपयांच्या मुद्देमालासह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design (19)

Fugitive innkeeper arrested : पुण्यातील गुन्हेगारीविरोधी कारवाईत वानवडी पोलिस ठाणे यांनी मोठे यश मिळवत एका फरार सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या कारवाईदरम्यान आरोपीच्या घरातून तब्बल 28 लाख रुपयांच्या मुद्देमालासह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम अजीज शेख (रा. गुलटेकडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ तस्करीप्रकरणी त्याच्याविरुद्ध वानवडी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल होता आणि तो मागील काही दिवसांपासून फरार होता.

पोलिस त्याचा शोध घेत असताना, 21 एप्रिल रोजी तो कॅम्प परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कॅम्प परिसरात सापळा रचत अक्रम शेख याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या गुलटेकडी येथील घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान पोलिसांना 920 ग्रॅम वजनाची अमली पदार्थासारखी पावडर सापडली, ज्याची अंदाजे किंमत 27 लाख 60 हजार रुपये आहे. याशिवाय 47 हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, एक मॅगझीन आणि सात जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली.

विवेक कोल्हेंचे राजकीय पुनर्वसन…विधान परिषदेवर वर्णी लागणार?

या कारवाईमुळे परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराला मोठा धक्का बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपीकडून या रॅकेटमधील इतर साथीदारांची माहिती मिळण्याची शक्यता असून, तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई अमितेश कुमार, रंजनकुमार शर्मा, मनोज पाटील, राजलक्ष्मी शिवणकर, नम्रता देसाई आणि संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील सहाय्यक निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू असून, अमली पदार्थांचा पुरवठा साखळी, त्याचे नेटवर्क आणि शस्त्रसाठ्याचा वापर याबाबत अधिक माहिती उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुणे पोलिसांकडून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

follow us