Anil Jaisinghani : जयसिंघानीमुळे क्रिकेटपटू अन् पोलीस येणार अडचणीत, मॅचफिक्सिंगच रॅकेट उघड

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 29T124906.911

मुंबई : अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) फसवणूक प्रकरणी अनिल जयसिंघांनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. १५ हजार कोटींचं मॅचफिक्सिंगचं मोठं नेटवर्क उघडकीस आला आहे. यामुळे अनिल जयसिंघांनी याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू आयपीएल टीम मालक गोत्यात येणार आहेत.

पाकिस्तान आणि दुबईमधील क्रिकेट बेटिंग कार्टीशीलशी अनिल जयसिंघांनी यांचे संबंध होते. या प्रकरणावर एक दूरध्वनी संभाषण समोर आले आहे. या दूरध्वनी संभाषणावरून मुंबई पोलिसांनी हा आवाज अनिल जयसिंघांनीचा असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. सध्या या प्रकरणाची मुंबई पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.

मुंबईत पाणीकपात, जलबोगद्याच्या दुरुस्तीवर, जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं 

नेमकं काय आहे प्रकरण ?

अनिल जयसिंघानीच्या अटकेनंतर १५ हजार कोटींचे मॅचफिक्सिंगचे मोठे नेटवर्क उघडकीस आलंय. या रॅकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी, मालक आणि पोलिसांचा समावेश आहे. भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस येतंय. आणि या सगळ्याचा थेट संबंध पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी असल्याचं देखील तपासात समोर आलंय. जयसिंघानीची एक ऑडिओ क्लिपही समोर आलीये. यामध्ये तो रमेश या फरार बुकीला मुंबई आणि ठाण्यात क्रिकेट बेटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देतोय. माझे स्वत:चे ठाणे आणि शिर्डी येथे थ्रीस्टार हॉटेल आहे. स्थानिक पोलिसांशी माझे चांगले संबंध आहेत आणि सुरक्षेसाठी दोन शस्त्रधारी गार्ड पण उपलब्ध करुन देतो असं जयसिंघानी या रमेश नावाच्या बुकीला सांगतोय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube