Gautami Patil : स्टेजवरच गौतमी पाटीलचा गेला तोल; सुरक्षा रक्षकांनी सावरताच पुन्हा धरला ठेका…

Gautami Patil : स्टेजवरच गौतमी पाटीलचा गेला तोल; सुरक्षा रक्षकांनी सावरताच पुन्हा धरला ठेका…

डिशो म्हंटल की, सध्या सबंध महाराष्ट्राच्या तोंडावर एकच नाव चर्चेत आहे ते म्हणजे गौतमी पाटील. अशातच अदाकारीने तरुणांना घायाळ करणारी गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात गौतमी पाटील स्टेजवर नाचत असतानाच गौतमी पाटीलचा तोल जाऊन कोसळल्याची घटना घडली. सांगलीमधील पलूसमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही घटना घडली आहे.

Khalga Trailer: अनाथ मुलांच्या अंतर मनाची व्यथाची हृदयस्पर्शी कथा; ‘‘खळगं’चा ट्रेलर प्रदर्शित

दहिहंडीनिमित्त राज्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे, सांगलीमधील तरुण भारत मैदानातही दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण गौतमी पाटील होती. त्यामुळे कार्यक्रमाला तरुणांची तुडूंब गर्दी झाली होती. कार्यक्रमादरम्यान, गौतमीसोबत अनेक तरुणांना गाण्यांवर ठेका धरल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं होतं.

Ahmednagar News : ‘त्या’ तरुणाला मारताना तुम्ही गप्प का बसले? बाळासाहेब थोरातांचा विखेंना सवाल

गौतमी पाटीलचं ‘फनटास्टिक म्हणतोय मला ह्यो पाव्हणा झालाय पागल पुरा’ गाण्यावर नृत्य सुरु होतं. आपल्या अदाकारीने गौतमी उपस्थित तरुणांना घायाळ करीत होती, मात्र, तिच्या नृत्याच्या एका स्टेपमध्ये ती अचानक पाय घसरुन पडली, यावेळी एका बाजूला गौतमीचा तोल गेल्याचं दिसून आलं होतं. गौतमी खाली कोसळताच सुरक्षा रक्षकांनी तिला तातडीने सावरलं. त्यानंतर गौतमी पुन्हा एकदा त्याचं जोशात नाचू लागली.

दरम्यान, अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडूनही गौतमी पाटीलने पुन्हा मुसंडी मारत चाहत्यांच्या मनात जागा केली आहे. सुरुवातीपासूनच तिच्या अश्लील नृत्याप्रकरणी गौतमीला सर्वच स्तरातून ट्रोल करण्यात आलं होतं., तिच्यावर अनेक टीका-टीप्पण्या केल्या जात होत्या. अखेर गौतमीने या प्रकरणी माफी मागितली होती. त्यानंतर आता पुन्हा राज्यभरात तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube