Girish Mahajan म्हणाले, 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप…

Girish Mahajan म्हणाले, 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप…

जिल्हा परिषद भरती (ZP Recruitment) परीक्षेबाबतची सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत असून या क्लिपमधील आवाज मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा असल्याचं सांगण्यात येत आहे. या क्लिपमध्ये विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषदेची भरती कधी होणार? हे विचारताच 16-18 लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवणं म्हणजे डोक्याला ताप झाला असल्याचं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे.

यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका ग्रामीण भागातील विद्यार्थ्याने मंत्री गिरीश महाजनांना जिल्हा परिषदेच्या भरतीबाबत फोन करुन विचारणा केली आहे. यावेळी विद्यार्थ्याला उत्तर देताना मंत्री गिरीश महाजनांनी डोक्याला ताप झाल्याचं म्हटलंय. ऑडिओ क्लिपमध्ये मंत्री महाजन म्हणाले, जिल्हा परिषदेच्या भरतीबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय होणार असून कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतरच भरतीची जाहिरात काढण्यात येणार असल्याचं महाजन यांनी सांगितलं आहे.

तसेच 2019 च्या भरतीच्या काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेतील 16 ते 18 लाख उमेदवारांना परिक्षेला बसवायचं म्हटल्यानंतर कंपनीसमोर मोठं आव्हानच उभं असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे आता एवढ्या उमेदवारांच्या परिक्षेचं नियोजन कसं कराव, याबाबत कंपनीकडून नियोजन सुरु आहे. दरम्यान, 2019 साली प्रसिध्द करण्यात आलेली ही भरती अद्याप न झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाची लाट पसरत आहे.

भरतीप्रक्रियेसंदर्भात सरकारमार्फत आत्तापर्यंत एकूण आठवेळा जीआर काढण्यात आले आहेत. मात्र, अद्याप या भरतीच्या उमेदवारांची परिक्षाचं झालेली नसल्याचं सांगण्यात येत आहे. भरती होत नसल्याने स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हतबल झाले असून एका संतप्त विद्यार्थ्याने थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनाच फोन लावून अद्याप भरती का घेतली जात नाही? याबाबत जाब विचारण्यात आला आहे. विद्यार्थी आणि मंत्री महाजन यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube