गुड न्यूज! जिल्हा परिषद, म्हाडा भरतीच्या उमेदवारांना परीक्षा फी परत मिळणार…

स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. 2019 साली जिल्हा परिषदेच्या विविध पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून घेण्यात आलेली परीक्षा फी पुन्हा उमेदवारांनी मिळणार असल्याचं बातमी समोर आली आहे. ही भरती प्रक्रिया तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्यानंतर अखेर भरती प्रक्रियाच रद्द झाल्याने परीक्षा परत करण्याबाबतचा निर्णय़ शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयाबद्दल आमदार रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.
रद्द झालेल्या #जिल्हा_परिषद #सरळसेवा परीक्षांचे शुल्क परत करण्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांची भेट घेतली होती.दिलेल्या शब्दाप्रमाणे #परीक्षा_शुल्क परत करण्यासंदर्भात परिपत्रक काढल्याबद्दल महाजन साहेबांचे मनस्वी आभार.परंतु जमा केलेल्या परीक्षा फी पैकी केवळ ६५%… https://t.co/F5THRe4Cjs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 8, 2023
जिल्हा परिषदेसह म्हाडा भरतीसाठी उमेदवारांकडून एक हजार रुपयांसह जीएसटी 180 रुपये तर मागास उमेदवारांकडून 900 रुपये आणि 162 रुपये जीएसटी घेण्यात आले होते. या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांनाही परीक्षा फी परत मिळणार असल्याचं प्रसिद्धीपत्रक शासनाकडून जारी करण्यात आलं आहे.
दरम्यान, सरकारी नोकरीसाठी अनेक उमेदवार कसोशीने प्रयत्न करीत असतात, दिवसरात्र अभ्यास करुन ते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी झटत असतात. प्रतिकूल परिस्थितीत ते शासनाकडून आकारण्यात येणारी परीक्षा फीची रक्कम अदा करीत असतात.
Happy Birthday Asha Bhosale : …म्हणून खय्याम यांनी आशाताईंकडून सरस्वतीची शपथ वदवली
सरकारी यंत्रणांच्या कारभाराचा मोठा अर्थिक फटका या उमेदवारांना बसत असतो, याचीच प्रचिती म्हणजे 2019 साली जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत उमेदवारांना फटका बसला होता, आता शासनाकडून परीक्षा फी परत देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याने उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
https://www.youtube.com/watch?v=Qbcr-Nl3sTI
उमेदवारांना परीक्षा फी परत देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर गिरीश महाजन यांनी मागणी मान्य केली असून आमदार रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत, अशातच आता परीक्षा फी फक्त 65 टक्केच रक्कम परत करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे, त्यावर सर्वच फी परत केल्यास उमेदवारांना दिलासा मिळणार असल्याचं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.