WRD Maharashtra Bharti 2023: जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांसाठी मोठी मेगाभरती
WRD Maharashtra Bharti 2023: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जलसंपदा विभागाच्या भरतीची वाट बघत असलेल्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. (WRD Maharashtra Bharti ) ती म्हणजे जलसंपदा विभागाच्या ताज्या अपडेटनुसार लवकरच संचालक, उपसंचालक, सहायक संचालक इत्यादी पदांसाठी भरती सुरू होणार आहे.
या भरतीमध्ये विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरतीविषयी अधिकच्या माहितीसाठी जलसंपादन विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in/ या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जलसंपदा विभागात लवकरच ५५७० पदांची मेगाभरती होणार आहे. या संदर्भात शासन निर्णय प्रसारित केला असून या अंतर्गत गट-क संवर्गातील अभियंता, लघुलेखक, सहायक अशी विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
या भरती अंतर्गत कोणत्या विभागात किती जागा भरल्या जाणार आहेत. नाशिक जलसंपदा विभागामध्ये विविध पदांवर एकूण १ हजार ७०० अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या जागा उपलब्ध आहेत. यापैकी ५० टक्के जागा रिक्त आहेत. यामध्ये सहाय्यक अभियंता पदाबरोबरच दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, कॅनॉल निरीक्षक अशा विविध पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूक कधी होणार, बावनकुळेंनी महिना सांगून टाकला..
यामुळे आता या भरती प्रक्रियेमध्ये आणखी ४८२ पदांची वाढ करून एकूण ९८२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी परीक्षार्थींनी मागणी करण्यात आली आहे. जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या औरंगाबाद परिमंडळात वर्ग ३ आणि ४ च्या मंजूर पदांपैकी ७५ टक्के पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. यातच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या वतीने जलव्यवस्थापन, धरणे, कालव्यांची देखभाल दुरुस्ती करणे, शेतीला पाणीपुरवठा करणे आदी कामे केली जाणार आहेत, तर जलसंपदा विभाग मोठी धरणे बांधण्याचे काम करतो. हे दोन्ही विभाग गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येतात.
Gautami Patil Dances Video: ‘घुंगरु’ घेऊन गौतमी पाटील लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर
या महामंडळातील अधिकारी, कर्मचारी दरमहा निवृत्त होत आहेत. पण मागील काही वर्षांपासून या विभागात पदभरती झाली नाही. यामुळे रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे एका अधिकाऱ्याकडे दोन किंवा अधिक पदांचा पदभार सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदांचा अहवाल महामंडळाच्या दक्षता पथकाने नुकताच शासनास सादर करण्यात आला आहे.
रिक्त पदांची संख्या: वर्ग १ च्या रिक्त पदांची संख्या- १४५, वर्ग २ ची रिक्त पदे- ७२२, वर्ग ३ ची रिक्त पदे- ५४१२, वर्ग ४ ची रिक्त पदे- १६०६
एकूण : ७८८५
पदाचे नाव- संचालक, उपसंचालक, सहायक संचालक, इत्यादी
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- लवकरच अपडेट करण्यात येईल.
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in