Money Laundering प्रकरणी नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका, वैद्यकीय जामीन नाकारला

Money Laundering प्रकरणी नवाब मलिकांना हायकोर्टाचा दणका, वैद्यकीय जामीन नाकारला

Navab Malik Money Laundering : राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मलिक गेल्या वर्षी 23 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर ते सध्या कुर्ला परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र आता पुन्हा मनी लॉन्ड्रींग प्रकरणी नवाब मलिकांना हायकोर्टाने दणका दिला आहे. कारण त्यांचा वैद्यकीय जामीन नाकारण्यात आला आहे. ( HC reject Ex Minister Navab Malik bail in Money Laundering case)

बच्चू कडू पुन्हा ‘वेट अँण्ड वॉच’च्या भूमिकेत; 18 तारखेला जाहीर करणार निर्णय

ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिकला अटक करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचा संदर्भ देत रूपाली चाकणकरांनी घेतला गोगावलेंचा समाचार

दरम्यान खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वैद्यकीय जामीन मिळावा यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र हाय कोर्टाने त्यांचा वैद्यकीय जामीन नाकारण्यात आला आहे. त्यानंतर आता या प्रकरणी पुढची सुनावणी 24 जुलैला होणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणी मलिकांना दिलासा मिळणार का? यकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. मलिक अजित पवारांना पाठिंबा देत असतील तर त्यांना दिलासा मिळू शकतो. अशा चर्चाना देखील उधाण आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube