हिंद केसरी स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील पैलवानांवर होणार कारवाई

हिंद केसरी स्पर्धेत खेळणाऱ्या महाराष्ट्रातील पैलवानांवर होणार कारवाई

पुणे : तेलंगणात होणाऱ्या 51 व्या हिंद केसरी स्पर्धेत महाराष्ट्रातील पैलवानांना खेळता येणार नाही. तरीही महाराष्ट्रातील पैलवान किंवा पंच सहभागी झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अस्थाई समितीनं दिला आहे. पण महाराष्ट्र केसरी खेळल्या जाणाऱ्या पैलवानांवर कारवाई केली जाणार नाही. याबाबत समितीनं एक पत्र काढून जाहीर केलंय.

भारतीय शैली कुस्ती महासंघानं दि. 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान हैदराबाद, तेलंगणा येथे अखिल भारतीय 51 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा -2023 आयोजित केली आहे. या स्पर्धेत जर महाराष्ट्रातील पैलवान खेळले किंवा पंच सहभागी झाल्यास महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची अस्थाई समिती कारवाई करणार असल्याचं पत्रात म्हटलंय.

भारतीय शैली कुस्ती महासंघ व भारतीय कुस्ती संघ, हे दोन वेगवेगळे देशस्तरीय कुस्ती संघ आहेत. हिंदकेसरी हे टायटल वापरण्याचा अधिकार भारतीय शैली कुस्ती महासंघाला आहे.

भारतीय कुस्ती महासंघानं महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली. त्यानंतर कुस्तीगीर परिषदेचा कारभार पाहण्यासाठी अस्थाई समिती स्थापन केली आहे. आता अस्थाई समितीनं महाराष्ट्रातील पैलवानांवर एक प्रकारे अन्याय केला जात असल्याचा आरोप राज्यातील पैलवानांकडून केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube