तो मी आयुष्यात मोठा मुर्खपणा केला; द्वारकाधीश मंदिरनिर्माणाबाबत असं का म्हणाले हिंतेंद्र ठाकूर?
Hitendra Thakur यांनी विरारमध्ये एक सुंदर असं द्वारकाधीशाचं बनवले आहे. या मागची कहाणी जाणून घेण्यासाठी लेट्सअपमराठीने त्यांच्याशी संवाद साधला.
Hitendra Thakur regret on Virar Dvarkadhis Mandir : मुंबईतील विरारमध्ये एक सुंदर असं द्वारकाधीशांचं मंदिर आहे. हे मंदिर राजकारणी आणि एकेकाळी ज्याचं नाव एक डॉन म्हणून घेतलं जात होतं. त्या हितेंद्र ठाकूर यांनी बनवले आहे. या मंदिरामागची कहाणी नेमकं काय हे जाणून घेण्यासाठी लेट्सअपमराठीने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी आपण हे मंदिरा बनवताना एक मुर्खपणा केला आहे. असं म्हटलं आहे. त्यांनी असं का म्हटलं जाणून घ्या सविस्तर…
मी देवधर्मवाला माणूस नाही शाळा-कॉलेजवाला आहे
या देवळाचं एक नव्या पैशाचं क्रेडीट मी घेणार नाही. मी शाळा कॉलेजवाला माणूस विना डोनेशनच्या शाळा आणि कॉलेज बनवणं हे माझं आयुष्यभरातील काम आहे. मेडीकल,पॅरामेडीकल सोडलं तर इंजिमिअरिंग फार्मसी, आर्किटेक्चर,पॉलिटेक्निक, अशी सगळी कॉलेजेस मी बनवली. पण माझ्या पत्नी प्रविणाला हे देऊळ बनवायचं होतं. ती म्हणाली छोटं कृष्णाचं देऊळ बनवायचंय मी म्हटलं छोटं कसलं बनवते जे वाटेल ते बनव. हे देऊळ मेन रोडला डोंगरावर होतं. मी मात्र देवधर्माच्या फार जवळ नाही आणि फार लांब आहे असंही नाही. रोज एक मिनिट देवाचं दर्शन घेतो आणि निघतो. बाकी उपासतापास अजिबात करत नाही. मी देवधर्मवाला माणूस नाही शाळा-कॉलेजवाला आहे.
असं का म्हणाले हितेंद्र ठाकूर?
एक दीड वर्षापूर्वी ती आली निते फाँडेशन काढलं अन् मी आयुष्यातील मोठी चूक केली. ती म्हणजे हे देऊळ बवण्यासाठी जी जागा ठरली होती. तिथे मला कोणतेही देऊळात जाणवणारे पॉझिटिव्ह वाईब्ज नाही आले मग मी प्रविणाला ही जागा निश्चित करायला सांगितलं आणि त्या फाँडेशनमधील दीड कोटी वाया जाऊ दे म्हटलं. हाच माझा मुर्खपणा झाला कारण हे मंदिर बनवताना मला जी किंमत पडली ती म्हणजे मंदिराचं काम चालू झालं अन् कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं. त्यात काम थांबलं.
दुबईतून ग्लोबल बिझनेस रिअॅलिटी Game Changers शोची सुरुवात; आर. माधवन करणार होस्ट
त्यानंतर अयोध्येत राम मंदिराचं काम सुरू झाल्याने सगळे कारागिर तिकडे गेले. त्यामुळे पुन्हा काम बंद झालं. असं करून हे देऊळ बनवायला 12 वर्षे लागले. उद्धाटन झालं आता ती समोरच्या कॉलेजची इमारत हलवून तिथे धर्मशाळेसाठी जागा मागत आहे. त्यामुळे मी म्हटलं की माणूस आयुष्यात किती मुर्खपणा करतो. मी तिकडे मंदिर जांल असतं तर तर 12-14 एकरमध्ये झालं असतं. आता मात्र तब्बल 75 एकर जागा या मंदिरासाठी गेली माझी. असं म्हणत ठाकूर यांनी या मंदिराच्या निर्माणाची कहाणी सांगत याचं सगळं श्रेय त्यांच्या पत्नीला दिलं.