माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही, हल्ला करणाऱ्यांना राज ठाकरेंचा इशारा

  • Written By: Published:
Raj Thackeray 1

ठाणे : आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात जाहीर सभेत बोलत होते. संदीप देशपांडेवर हल्ला करणाऱ्याला इशारा दिला आहे. ज्याने हल्ला केला त्याला लवकरच कळेल आणि ज्याने हे घडून आणले त्यालापण कळेल मी माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही. असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

Raj Thackeray : ‘मनसेच्या वाट्याला कुणी जायचं नाही, गेलं ना मुख्यमंत्रीपद’

तसेच पुढे राज ठाकरे म्हणाले मराठी चित्रपटाला हक्काचे चित्रपटगृहे आम्ही मिळून दिले. आमच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रात मोबाईल वर मराठी ऐकू येऊ लागले, दुकानावरच्या पाट्या मराठीत झाल्या, परंतु महाराष्ट्रात राहून देखील हे करावं लागत यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं कोणतं नाही.

पुढे राज ठाकरे यांनी महाराष्ट नवनिर्माण सेना पक्षाला नाव ठेवणाऱ्याना म्हणाले की ते तेरा आमदार काय सोरटवर निवडुन आले नव्हते ते आम्ही आमच्या बळावर निवडून आणले होते. पक्षाचं काय सांगता ज्या पक्षाने 70 वर्ष देशावर राज्य केले त्या पक्षाची आज काय परिस्थिती आहे हे सांगण्याची गरज नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी काँग्रेसला लगावला.

तुम्हाला पण ओहोटी येईल… भाजपवाले हे विसरू नका, राज ठाकरेंचा टोला

यावेळी त्यांनी गेल्या सतरा वर्षात मराठी भाषेसाठी आणि मराठी मराठी माणसासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही केलं ते सर्व यावेळी राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले मनसे एवढी आंदोलने गेल्या सतरा वर्षात कोणीच केले नाहीत. मराठी माणसाच्या प्रत्येक हक्कासाठी मनसे लढली आणि पुढे पण लढत राहील असं देखील यावेळी राज ठाकरे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube