‘ही’ 3 कामे आजच पूर्ण करा; डेडलाइन लवकरच संपणार, मार्चअखेरची कोणती आर्थिक काम राहिलीत?

Updated ITR Filing : चालू आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला अनेक मोठे बदल झाले आहेत. या महिन्यात तुमच्या आर्थिक कामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी करण्याची शेवटची संधी आहे. (ITR) यामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) ते आयकर रिटर्नशी (ITR) संबंधित कामांचा समावेश आहे. या महिन्यात आयटीआर फाइल करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. तसेच तुमचे पीएफ खाते मॅनेज करण्यासाठी UAN अॅक्टिव करण्याची अंतिम मुदत देखील जवळ आली आहे. कोणती कामे आहेत ते जाणून घेऊया.
ITR दाखल करणे
पहिले आणि सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे ITR दाखल करणे. ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 आहे. FY22-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना तुम्ही काही चुका केल्या असतील आणि त्या दुरुस्त करायच्या असतील तर करु शकतात. तसंच, फाईल करताना उत्पन्नाशी संबंधित कोणतीही मोठी माहिती चुकली असेल, तर ती अपडेट करण्याची या मुदतीपर्यंत संधी आहे. अशा परिस्थितीत, शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा.
मोठी बातमी! एप्रिल महिन्यात राज्यात आर्थिक गणना? अंगणवाडी अन् आरोग्य सेवक करणार सर्व्हे
तुम्ही 31 मार्च 2025 पर्यंत काही बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता आणि आयटीआर दरम्यान कर वाचवण्यासाठी कपातीचा दावा करू शकता. यासाठी तुम्ही विविध सरकारी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी NSC, सुकन्या समृद्धी योजना, PPF, NPS असे पर्याय उपलब्ध आहेत. आयकर कायद्यांतर्गत, तुम्हाला कलम 80C, 80D आणि 80CCD-1B अंतर्गत कर लाभ मिळू शकतो.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर
नोकरदार लोकांसाठी त्यांचे पीएफ खाते मॅनेज करण्यासाठी त्यांचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय करण्याची आणि त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत 15 मार्च 2025 आहे. UAN सक्रिय करण्याचे अनेक फायदे आहेत आणि असे करून तुम्ही EPFO च्या सर्व ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता. EPFO ने गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या कामाची मुदत वाढवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी या कामासाठी 15 फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. ईपीएफओने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.