मोठी बातमी! एप्रिल महिन्यात राज्यात आर्थिक गणना? अंगणवाडी अन् आरोग्य सेवक करणार सर्व्हे

Maharashtra News : राज्यातील सर्वच कुटुंबातील व्यक्तींचे उत्पन्नाचे साधन कोणत, ते काय उद्योग करतात, नोकरी करतात की एखादा व्यवसाय या सगळ्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात आर्थिक गणना होणार असल्याची माहिती आहे. अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविकांच्या माध्यमातून गणना होणार आहे. देशात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. मागील जनगणना 2011 मध्ये झाली होती. त्यानंतर 2021 मध्ये होईल अशी शक्यता होती. परंतु, कोरोनाचे संकट असल्याने जनगणना टाळण्यात आली होती.
या सर्व्हेसाठी मनु्ष्यबळ कमी पडल्यास शिक्षक संघटनांचीही मतद घ्यावी. याबाबतीत त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र पाठवले आहे. राज्यात सर्वेक्षणाला सुरुवात होण्याआधी संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्वेत नेमक्या कोणत्या बाबी असतील, कोणती माहिती कशा पद्धतीने घ्यायची, माहिती तयार करुन अहवाल कसा तयार करायचा यांसह अन्य आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जातीनिहाय जनगणना करा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी
प्रत्येक कुटुंबाची माहिती घेतली जाणार आहे. या कामासाठी अंगणवाडी सेविक आणि आरोग्य सेवकांची मदत घेतली जाणार आहे. शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्यात गणना करण्याचे नियोजन आहे. या सर्वेतून कोणत्या वयोगटातील व्यक्ती, युवक युवती, व्यवसाय, नोकरी करतात किंवा बेरोजगार आहेत याची माहिती मिळेल. त्यानुसार सरकारला उपाययोजना करण्यास मदत होणार आहे.