Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक
IPS Sanjay Kumar Verma Appointed New DGP of Maharashtra : रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची बदली करावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानंतर काल (दि.4) शुक्ला यांची बदली करण्यात आली होती. शुक्ला यांच्या बदलीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला होता.
Sanjay Kumar Verma, IPS (MH:1990) to be the new DGP of Maharashtra. pic.twitter.com/wvRoMAjqsi
— ANI (@ANI) November 5, 2024
रश्मी शुक्लांच्या बदलीनंतर निवडणूक आयोगाने नव्या पोलीस महासंचालक पदासाठी आज (दि.5) दुपारी एक वाजेपर्यंत नावे सुचवण्यास सांगितले होते. त्यानंतर या पदासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार हे तीन नावे सुचवण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Video : माझ्यानंतर २५ ते ३० वर्ष अजितदादांचे; आता पुढची तयारी युगेंद्रची, पवारांचा मास्टर प्लॅन ठरला
कोण आहेत राज्याचे नवे पोलीस महासंचालक?
रश्मी शुक्ला यांना पदावरुन हटवल्यानंतर संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी आहेत. सध्या वर्मा डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहे. वर्मा यांचे नाव नवे पोलीस महासंचालक म्हणून कालपासून चर्चेत होते. निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केल्यानंतर ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
मोठी बातमी : प्रत्येक खासगी मालमत्तेवर सरकारचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
शुक्लांवर फोन टॅपिंगचे आरोप
रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे त्या वारंवार वादात अडकल्या होत्या. याआधी, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला या चर्चेत आल्या होत्या. एवढेच नव्हे तर, अजूनही आमचे फोन टॅप होत आहे, अशी तक्रार काँग्रेस आणि महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले होते.