तनपुरेंसारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे विकासाला खीळ; शिवाजीराव कर्डिलेंची खोचक टीका

तनपुरेंसारख्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे विकासाला खीळ; शिवाजीराव कर्डिलेंची खोचक टीका

Shivajirao Kardile News : प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंवर केलीयं. दरम्यान, निवडणुकीत बाजी मारण्यासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडून जोरदार प्रचार सुरु आहे. मतदारसंघातील बारागाव नांदूर भागात कर्डिले यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी बोलताना कर्डिलेंनी टीका केलीयं.

धनगर आरक्षणासाठी निलंगेकरांनी विधानसभेतही उठवला होता आवाज; महायुतीचं सरकार आल्यावर प्रश्न सोडवण्याचं आश्वासन

कर्डिले पुढे बोलताना म्हणाले, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिलेले आश्वासने पूर्ण केली नाही‌त, म्हणूनच गावोगावची जनता माझ्या पाठीमागे उभी आहे. निष्क्रिय लोकप्रतिनिधी असल्यामुळे मतदारसंघात विकासाला खीळ बसलीयं, त्यामुळे आता जनतेचा उद्रेक झाला असून माझी निवडणूक जनतेनेच हाती घेतली असल्याचं कर्डिले यांनी म्हटलंय.

तसेच कै. शिवाजीराव गाडे हे स्वाभिमानी नेते होते. सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात जाऊन प्रश्न सोडवण्याचे काम करत असल्यामुळेच जनता त्यांच्या पाठीमागे उभी राहिली. त्याचा राग धरून तनपुरे कुटुंबियांनी गाडे कुटुंबियांना संपविण्याचे काम केले. मात्र यापुढे शिवाजीराव कर्डिले त्यांच्या पाठीमागे गंभीरपणे उभा आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये आदिवासी समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे. कैलासवासी शिवाजी गाडे यांच्यामुळेच मी आमदार झालो. त्यांचा मुलगा धनराज गाडे तनपुरे कुटुंबांचा स्पर्धक होऊ नये म्हणून गाडे कुटुंबाला अडचणीत आणण्याचे काम केले गेले असल्याचा आरोप तनपुरेंनी केलायं.

वॉकओव्हर की रणनीती.. भाजपाच्या निशाण्यावरुन हेमंत सोरेन गायब; कारण काय?

दरम्यान, राहुरी विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी बारागाव नांदूर, कुरणवाडी, चिंचाळे, गडचे आखाडा, घोरपडवाडी, मल्हारवाडी, मोमिन आखाडा, बोरटेक परिसरात प्रचार फेरी काढून मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, विक्रम तांबे, प्रभाजी सुळ, सारंगधर पवार, ज्येष्ठ नेते कैलास पवार, युवराज गाडे, राजेंद्र गोपाळे , रखमा खिलारी, सुरेश बांदकर, नसीर शेख, भारत जाधव, अण्णासाहेब भास्कर, साहेबराव शिंदे, सयाजी श्रीराम, अशोक घाडगे, संदीप गाडे, शिवाजी सागर, रघुराम शिंदे, बाबासाहेब धोंडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी कधीही विकास कामात राजकारण केले नसून विरोधकांचे देखील काम केले आहे. शेतकरी मंडळ माजी कर्डिले यांच्या पाठीमागे उभे आहे. माझी मागच्या वेळेस चूक झाली. बारागाव नांदूर पाणी योजना लाईट अभावी बंद करण्यात आली होती. मात्र, कर्डिले यांना एक फोन केला आणि 17 गावाची पाणी योजना सुरू झाली. शिवाजीराव कर्डिले हे कामाचा माणूस आहे. तनपुरे कुटुंब अफवा पसरवण्यात पटाईत आहेत. त्यांनी मला राजकारणातून संपविण्याची काम केले. राहुरी तालुक्यातील जनता परिवर्तनाची वाट पाहत असून 23 तारखेला आपला विजय निश्चित होईल. तनपुरे कुटुंबीयांनी माझी बदनामी करायला सुरुवात केली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मी गेल्या पंधरा वर्षांपासून राहुरी तालुक्यातील जनतेशी भेट संपर्कात असल्यामुळे त्यांना आता माहित आहे खरी दहशत कोणाची आहे, असे मत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे यांनी व्यक्त केले‌.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube