राष्ट्रपती पदकांची घोषणा! महाराष्ट्रातील 3 IPS आणि 17 पोलिसांचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान…
President’s Medal : देशभरातील पोलीस दलात तसेच सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) सन्मानित केले जाते. यंदाही राज्यातील राज्यातील 3 वरिष्ठ पोलीस अधिकारी, अग्निशमन दलातील एक अधिकारी, कारावास सेवेतील एक हवालदार यांना पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक (President’s Medal) जाहीर झालं आहे. तर 17 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 साठी संघाची घोषित, श्रेयस अय्यर, शुभमन गिलसह ‘या’ स्टार खेळाडूकडे मोठी जबाबदारी
पोलीस सेवेतील तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केलं जाणार आहे. आयपीएस चिरंजीव प्रसाद, राजेंद्र दहाळे आणि एसीपी सतीश गोवेकर यांचा त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान होणार आहे. उद्या (दि. 15 ऑगस्ट) स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
पोलीस सेवेतील अतुलनीय कार्यासाठी राष्ट्रपती पदक
चिरंजीव रामचबिला प्रसाद, अतिरिक्त पोलीस महासंचालक
राजेंद्र बालाजीराव दहाळे, संचालक
सतीश रघुवीर गोवेकर, सहायक आयुक्त
अग्निशमन दल
संतोष वारिक, मुख्य अग्निशमन अधिकारी, महाराष्ट्र
कारावास सेवा
अशोक ओलंबा, हवालदार
पोलीस सेवेतील शौर्यतेसाठी राष्ट्रपती पदक
कुणाल शंकर सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी
दीपक आवटे, पोलिस उपनिरीक्षक
कै. धनाजी होनमाने, पोलीस उपनिरीक्षक (मरणोत्तर)
नागेश कुमार एम. (नायक पोलीस शिपाई)
शकील युसूफ शेख (पोलीस शिपाई)
विश्वनाथ पेंदाम (पोलीस शिपाई))
विवेक नारोटे (पोलीस शिपाई)
सरकारने विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी वळवले, ठाकरे गटाचा गंभीर आरोप…
मोरेश्वर पोटवी (पोलीस शिपाई)
कैलास कुलमथे (पोलीस शिपाई)
कोथला कोर्मी (पोलीस शिपाई)
कोरके वेल्डी (पोलीस शिपाई)
महादेव वानखडे (पोलीस शिपाई)
आयपीएस अनुज तारे (अतिरिक्त पोलीस अधीक्षक)
राहुल देव्हडे (पोलीस उपनिरीक्षक)
विजय सकपाळ (पोलीस उपनिरीक्षक)
महेश मिच्छा (हेड कॉन्स्टेबल)
समया असम (नायक पोलीस शिपाई)