Irshalwadi Landslide : बचावकार्य सुरु पण NDRF समोर उभा आव्हानांचा डोंगर; जवान म्हणाले, दबलेले मृतदेह…

Irshalwadi Landslide : बचावकार्य सुरु पण NDRF समोर उभा आव्हानांचा डोंगर; जवान म्हणाले, दबलेले मृतदेह…

Irshalwadi Landslide Rescue Operation : रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. खराब हवामानामुळे इर्शाळवाडीत थांबविण्यात आलेले बचावकार्य आज पहाटे 5 वाजल्यापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तरी देखील NDRF समोर उभा आव्हानांचा डोंगर कमी झालेला नाही. ( Irshalwadi Landslide Rescue Operation NDRF facing problems )

Manipur Violence : ‘समान नागरी कायद्याच्या गप्पा मारताय, आधी मणिपूरकडे बघा’; राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

जवानांनी सांगितली बचावकार्यातील आव्हानं…

आज पुन्हा एनडीआरएफच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. त्यावेळी जवानांनी त्यांच्या समोरंची आव्हानं सांगितली. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात चिखल आहे. त्यामध्ये सर्व घरं 15 ते 20 फुट गाडले गेलेले आहेत. त्यामुळे जवानांना रेस्क्यू ऑपरेशन करताना अचानक एखाद्या घरामध्ये खोल कोसळण्याची भीती आहे. इर्शाळवाडित पाऊसही थांबत नसल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Manipur Violence : मणिपूर घटनेचे विधानसभेत पडसाद; वर्षा गायकवाड, यशोमती ठाकुर आक्रमक

यावेळी यासंदर्भात महिती देताना एनडीआरएफचे जवान शर्मा म्हणाले, वरून सुरू असलेला पाऊस, चिखलात दबलेली घर यामुळे आम्हाला एका बाजून हळूहळू हे बाचव कार्य करावं लागत आहे. कारण वेगाने माती दूर केल्यास आणखी समस्या निर्माण होत आहेत. आम्ही सध्या गावाच्या वरच्या भागात हे रेस्क्यू करत आहोत.

आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करत आहोत मात्र किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही. हे काम सोप नाही. कारण आम्हाला मानसांच्या सहाय्याने फावड्याने माती काढावी लागत आहे. त्यात गाडले गेलेले मृतदेह सडायला सुरूवात होईल. पण आम्ही प्रयत्न करत राहू. असं हे जवान म्हणाले. तर या जवानांच्या अथक प्रयत्नांदरम्यान मृतदेह सडायला सुरूवात झाल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube