संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारली अभिरूप संसद

Jadhavar Law College : जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने 'अभिरूप संसद 2026' चे आयोजन

Jadhavar Law College

Jadhavar Law College Hosts Mock Parliament 2026 : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिका, विधेयकांवरील चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास आणि विविध विषयांवरील वादविवाद अशा संसदीय वातावरणात जाधवर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष संसदीय कामकाजाचा अनुभव घेतला. संविधानाविषयी जागरूकता, चिकित्सक विचार, प्रभावी वक्तृत्व आणि विधिनिर्मितीचे कौशल्य विकसित करण्यासाठी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या जाधवर विधी महाविद्यालयाच्या वतीने अभिरूप संसद 2026 चे आयोजन करण्यात आले.

ध्रुव जुरेलची नंबर ‘सातव’वर खणखणीत शतकीय खेळी; हार्दिक पांड्याच्या विक्रमाशी बरोबरी

नऱ्हे येथील शैक्षणिक संकुलात अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्या डॉ. सपना सुकृत देव यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभिरूप संसदेत विद्यार्थ्यांनी कायदे निर्मात्यांची भूमिका साकारत संसदीय कार्यपद्धती आणि प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. समकालीन राष्ट्रीय विषयांवर चर्चा व वादविवाद करण्यात आले. तसेच संसद सदस्यांच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी आपली मते मांडत चिकित्सक विचार, तार्किक मांडणी आणि प्रभावी वक्तृत्वाचे कौशल्य दाखविले.

चिमुकले जळून खाक, तरी सरकारला येईना जाग; दवाखान्यातील अग्निरोधक यंत्रणा उभारणीचे प्रस्ताव धूळखात

ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, विद्यार्थ्यांनी विधेयक मांडणी, प्रश्नोत्तरे, चर्चा, वादविवाद तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. संविधान, कायदा आणि लोकशाही व्यवस्थेचे ज्ञान प्रत्यक्ष कृतीतून मांडताना विद्यार्थ्यांनी संसदीय शिस्त, नेतृत्वगुण आणि कायदेशीर विचारक्षमता यांचे दर्शन घडविले.

या उपक्रमासाठी अनुभवी प्राध्यापकांचे परीक्षक मंडळ होते. विद्यार्थ्यांची तयारी, विषयावरील पकड, युक्तिवाद, संसदीय शिस्त आणि प्रभावी सादरीकरणाच्या आधारे परीक्षण व मूल्यमापन करण्यात आले. सहभागी तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. परीक्षकांनी केलेले मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरले.

सुजय विखे पाटील यांची आयुष्मान भारत प्रकोष्ठाच्या प्रदेश प्रभारीपदी नियुक्ती

विद्यार्थ्यांना केवळ कायद्याचे शैक्षणिक ज्ञान न देता संसदीय लोकशाही, संविधान आणि विधिनिर्मिती प्रक्रियेची प्रत्यक्ष जाणीव करून देणे, तसेच भविष्यातील सक्षम कायदेतज्ज्ञ आणि लोकशाही प्रक्रियेतील जबाबदार नागरिक म्हणून त्यांची जडणघडण करणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. या अभिरूप संसदेचे समन्वयक म्हणून डॉ. सौम्या एस. कृष्णन आणि अभिषेक यादव यांनी काम पाहिले.

follow us