मोठी बातमी! आंदोलक मनोज जरांगेंच्या आंदोलनाला कोर्टाने फटकारलं, उद्याही होणार सुनावणी

Bombay High Court on Jarange Patil : मुंबईत आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालीआंदोलन सुरु आहे. आजच्या दिवसाची सुनावणी पूर्ण झाली आहे. उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतरच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी कोर्टाकडून स्पष्ट आदेश येऊ शकतो. न्यायमुर्ती रवींद्र घुगेंच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. आजच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
मैदानाव्यतिरिक्त आंदोलकांनी इतर ठिकाणी वावरु नयेत असे थेट आदेश कोर्टाने दिले आहेत. 5 हजारपेक्षा जास्त लोक येऊ नये ही आयोजक आंदोलकांची जबाबदारी होती असं कोर्टाने म्हटलं. तसंच, आमरण उपोषणाला परवानगी नव्हती, पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर मैदान खाली करणं आवश्यक होतं असंही कोर्टाने म्हटलय
सध्या आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलक वावरताना दिसतायत. CSMT परिसर मराठा आंदोलकांनी व्यापून टाकलेला दिसतो. मराठा आंदोलकांचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यात मराठा आंदोलक रेल्वे स्टेशन, परिसरात कबड्डी, खो-खो खेळतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रस्त्यावर मराठा आदोलकांनी आंघोळ केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
हायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तिथलं जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केल जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. रेल्वेच्या फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी डब्यात वाट्टेल तसे आंदोलक फिरत आहेत.