महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मा तर शिव प्रताप शुक्ला तेलंगणाचे नवे राज्यपाल
Jishnu Dev Verma : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे.
Jishnu Dev Verma : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. जिष्णू देव वर्मा भाजपचे जेष्ठ नेते असून आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर शिव प्रताप शुक्ला तेलंगणाचे नवे राज्यपाल असणार आहे.
सप्टेंबर 2025 मध्ये देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याने सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर राष्ट्रपती द्रौपती मुर्मू यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालाचा अतिरिक्त कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे सोपवला होता. तर आता जिष्णू देव वर्मा (Jishnu Dev Verma) यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आली आहे. जिष्णू देव वर्मा जुलै 2024 पासून तेलंगणाच्या राज्यपालाची जबाबदारी सांभाळत होते.
कोण आहेत जिष्णू देव वर्मा?
जिष्णू देव वर्मा त्रिपुराचे असून त्यांनी 2018-23 पर्यंत त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहिले आहे. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1957 रोजी अगरतळा येथे झाला आहे. 1990 पासून ते भाजपमध्ये सक्रिय आहे. त्यांनी 1996, 1998 आणि 1999 मध्ये त्यांनी त्रिपुरा ईस्ट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
तर दुसरीकडे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून तरनजित सिंग संधू यांची नियुक्ती झाली आहे. याचबरोबर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे.
सिंहसह ‘या’ राशींना आज होणार आर्थिक फायदा; जाणून घ्या 12 राशींसाठी आजचा दिवस कसा राहणार?
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. तर तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी यांची पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडणार आहे. आणि लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
