मोठी बातमी! सीपी राधाकृष्णन देशाचे नवे उपराष्ट्रपती; निवडणुकीत इंडिया आघाडीची मते फुटली

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने बाजी मारली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सीपी राधाकृष्णन यांनी निवडणूक जिंकली.

Cp Radhakrishnan

Vice President Elections CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने बाजी मारली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांनी निवडणूक जिंकली. राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. या निवडणुकीत एकूण 788 लोकांना मतदानाचा अधिकार होता. यातील 781 खासदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 98.2 टक्के इतके मतदान झाले. एकूण 767 मते टाकण्यात आली. यातील 752 मते वैध ठरली. सीपी राधाकृष्ण्न यांना 452 तर इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळावली. राधाकृष्णन यांनी जवळपास 152 मतांच्या आघाडीने सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. विरोधी पक्षांच्या 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केले असा दावा भाजपने केला आहे.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार सुदर्शन रेड्डी (Sudarshan Reddy) यांनी चांगले आव्हान दिले होते. परंतु, त्यांच्याकडील संख्या सत्ताधारी (CP Radhakrishnan) एनडीएच्या तुलनेत कमी राहिली. या निवडणुकीत (Vice President Election) जिंकण्यासाठी 392 मतांची गरज होती. राधाकृष्णन यांनी 452 मते मिळवली. आज सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. या विजयानंतर एनडीए आघाडीत जल्लोषाचे वातावरण आहे.

संसदेत आज उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक! राधाकृष्णन विरुद्ध रेड्डी, कोण मारणार बाजी?

इंडिया आघाडीच्या खासदारांचे क्रॉसवोटिंग 

विरोधी पक्षांतील 14 मते एनडीएसाठी मोठे यश (NDA Alliance) ठरले. कारण एकूण 15 मते बाद झाली होती आणि 14 खासदारांची मते एनडीएला मिळाल्याने विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा मतांचा आकडा आणखी कमी झाला. एनडीएच्या एकूण खासदारांची संख्या 427 होती यात वायएसआर काँग्रेसच्या 11 खासदारांना (INDIA Alliance) धरले तर हा आकडा 438 इतका झाला. तसेच 14 अतिरिक्त मते वोट क्रॉसिंगच्या माध्यमातून राधाकृष्णन यांना मिळाल्याचा दावा केला जात आहे.

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणूक घेण्यात आली. आज सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत मतदान झाले. संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या खासदारांनी मतदान केले. विरोधी पक्षांनी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देऊन वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एनडीएने आपली रणनीतीच्या माध्यमातून क्रॉस वोटिंग घडवून आणलं आणि इंडिया आघाडीच्या मतदानात फूट पाडली. या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली.

ब्रेकिंग : इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी SC चे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डींना उमेदवारी

या निवडणुकीनंतर बोलताना इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांनी सांगितले की मी माझ्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करण्याचं आवाहन खासदारांना केलं होतं. याच कारणामुळे क्रॉसवोटिंग झालं आणि एनडीएला फायदा झाला. या निवडणुकीत एकूण 15 मते बाद झाली. यावरून असे लक्षात येते की खासदारांनी मतदान प्रक्रियेत चूक करणे किंवा जाणुनबुजून चुकीचे मत देण्याची शक्यता होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube