शिवरायांवरील विधानानंतर Jitendra Awhad यांचे नवे ट्वीट, “मी जे बोललो ते…”

Untitled Design (30)

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सध्या शिवरायांवरील आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने तसेच निदर्शने सुरु केली आहे. एकीकडे हे सुरु असताना मात्र दुसरीकडे आव्हाड यांनी पुन्हा एक नवे ट्विट केले आहे. “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे, असे आव्हाड म्हणाले आहे. म्हणजेच ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे याद्वारे स्पष्ट होत आहे.

नेमकं काय म्हणाले होते आव्हाड?
रामायणातून रावण काढून श्रीराम समजावून सांगा. महाभारतातून दुर्योधन, कर्ण काढून कृष्णअर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघलशाही काढून शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा.. इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजावून सांगा असं ट्विट आव्हाड यांनी केलं होत.

शिंदे गट आणि भाजपाकडून आव्हाड यांच्यावर टीका केली जात असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान एका ट्वीटद्वारे आव्हाड यांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा पूर्ण व्हिडीओ पोस्ट करून तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही त्याला उत्तर देऊ, असे आव्हाड म्हणाले आहेत.


आव्हाड व्हिडीओत नेमकं काय म्हणाले?
“मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे. बहुजनांना बदनाम करण्याची जुनीच पद्धत आहे. जे सत्य आहे ते लोकासमोर मांडले. तुम्ही बहुजन महापुरुषांची बदनामी करा. आम्ही उत्तर देऊ,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. तसेच बहुजन इतिहास डोळ्यात का सलतो? असा थेट सवालही आव्हाड यांनी केला असून ‘करारा जवाब मिलेगा’ असेही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विधानानंतर नागपूर, पुण्यात निदर्शने करण्यात आली. भाजपाच्या काही नेत्यांनी आव्हाड यांचा निषेध व्यक्त केला. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आव्हाड यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असे म्हणत टीका केली आहे.

Tags

follow us