प्रत्येकवेळी पवार साहेब उभं राहायचे; भुजबळांच्या नाराजीवर आव्हाडांकडून जुनी आठवण

  • Written By: Published:
प्रत्येकवेळी पवार साहेब उभं राहायचे; भुजबळांच्या नाराजीवर आव्हाडांकडून जुनी आठवण

Jitendra Awhad Reaction on Bhujbal : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. यामुळे ते लवकरच बंड पुकारण्याच्या तयारीत आहेत. (Bhujbal) आता छगन भुजबळांचे जुने सहकारी आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

जहाँ नही चैना वहाँ नहीं; 8 दिवसांपूर्वीच्या मोठ्या ऑफरचा उल्लेख करत भुजबळांचे बंडाचे संकेत?

छगन भुजबळ नाराज असल्याचे कळताच जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी अनेक जुन्या गोष्टी नमूद केल्या आहेत. तसंच, छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने कशाप्रकारे मान-सन्मानाने वागणूक दिली, याबद्दलही त्यांनी भाष्य केलं. छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभं रहायचे, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

आज छगन भुजबळ साहेबांकडं बघताना एक विचार नक्कीच माझ्या मनात आला. ज्या दिवसापासून आदरणीय शरद पवार साहेबांसोबत छगन भुजबळ साहेब आले. त्या दिवसांपासून आदरणीय साहेबांनी त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळले. भुजबळ साहेबांचा मानसन्मान हा पहिल्यांदा राखला जायचा. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ, पहिले उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…

छगन भुजबळ यांच्यावरील प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायला आदरणीय पवार साहेब स्वतः उभे रहायचे. १९८५ -९० च्या काळात पवार साहेबांना सर्वाधिक त्रास भुजबळांनीच दिला होता. हा सगळा राजकीय प्रवास बघितल्यावर भुजबळांच्या कर्तृत्वावर महाराष्ट्रात कोणाच्याही मनात शंका नसेल. आदरणीय साहेबांनी भुजबळांवर जेवढे प्रेम केले तेवढे कदाचित बाळा साहेबांनंतर कुणीही केले नसेल. मला माहित नाही का, पण राहून राहून वाटतय की, आदरणीय शरद पवार साहेबांसारखा कार्यकर्त्यांना जपणारा नेता आजतरी महाराष्ट्रात नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube