Kasba आणि Chinchwad पोटनिवडणुकीसाठी उमेदवार आज अर्ज भरणार
पुणे : पुण्याच्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक व चिंचवडचे भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोट निवडणूक होणार आहे. या पोट निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून इतर पक्षांना आवाहन करण्यात येत आहे. मात्र निवडणुका होणारच अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीने (NCP) घेतली आहे.
कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी आज भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबरोबरच कॉग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांचं अधिकृत नाव जाहीर करण्यात आलं नसलं तरी कॉंग्रेसचा उमेदवार आज अर्ज भरणार आहे.
दरम्यान निवडणुका म्हंटल्या की बिनविरोध होणार असं नसत असं विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्ट केले होते. याचाच अर्थ या निवडणुकीत राष्ट्रवादी देखील उमेदवार उभा करणार हे नक्की. मात्र राष्ट्रवादीने अद्याप चिंचवडसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र राष्ट्रवादीकडून राहुल कलाटेचं नाव आघाडीवर आहे.
बिनविरोधासाठी मुख्यमंत्र्यांचं आवाहन
भाजपापाठोपाठ या निवडणूक बिनविरोध व्हाव्यात यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील आग्रही आहे. नुकतेच मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना फोन केले आहेत.
तसेच या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी त्यांनी विंनती देखील केली आहे. एखाद्या मतदारसंघात लोकप्रतिनिधींचे निधन झाल्यास त्या मतदारसंघात उमेदवार न देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. ही परंपरा विरोधी पक्षाने जपावी असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. and assembly