मराठवाडा, विदर्भासाठी लढणारे केशवराव धोंडगे हरपले, 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठवाडा, विदर्भासाठी लढणारे केशवराव धोंडगे हरपले, 102 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

औरंगाबाद : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं निधन झालंय. वयाच्या 102 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वतंत्र विदर्भ आणि मराठवाड्यासाठी त्यांनी सरकारदरबारी अनेकदा मागणी केली होती.

महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारा अस्सल मराठवाडी इरसालपणा आणि मराठवाडी बोलीच्याही गोडव्याचा ठसा उमटवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. ते राजकारणात आले, तेव्हा महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाचा बोलबाला होता.

याच पक्षाचे विधानसभा सदस्य म्हणून ते सहा वेळा आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून एक वेळा विजयी झालेले आहेत. केशवरावांची साम्यवाद, मार्क्सवाद एकाच वेळी श्रद्धा आहे. एकाच वेळी महात्मा गांधी आणि क्रांतीवर श्रद्धा असणारा पाहण्यात आलेले केशवराव पत्रकारितेतले एकमेव राजकारणी ठरले आहेत.

नांदेडमध्ये त्यांनी शरद पवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमात केशवराव धोंडगे यांनी पवारांचा भर स्टेजवरच मुका घेतला होता. त्यांचे आणि शरद पवारांचे अतिशय जवळीक होती. त्यांचा स्वभाव मृदू आणि तितकाच हसता-खेळता, तितकाच परखड आणि स्पष्ट बोलण्याची त्यांना सवय होती.

दरम्यान, त्यांच्यावर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरु असतानाच अखेर त्यांची प्राणज्योत मावळली आहे. धोंडगे बरीच वर्ष विधिमंडळाचे सदस्य राहिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube