किशोरी पेडणेकर अडचणीत! कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पेडणेकरांच्या कंपनीविरोधात FIR दाखल

  • Written By: Published:
किशोरी पेडणेकर अडचणीत! कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पेडणेकरांच्या कंपनीविरोधात FIR दाखल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. SRA मधील घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या सातत्याने पेडणेकर यांच्यावर आरोप करत आहेत. त्यातच आता किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सोमय्यांनी ट्विट करून दिली.

किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकार असताना आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी, अनिल परब, संजय राऊत यांच्या विरोधात आक्रमक झाले होते. सध्या किरीट सोमय्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हसन मुश्रीफ आणि शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आता किरीट सोमय्या किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं.

सोमय्या यांनी ट्विट करून म्हटलंय की, किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट कंपनी, एम पी एंटरप्राईस, बेस्ट ( मुंबई महापालिका) व अन्य कंपन्या विरुद्ध १००० कर्मचाऱ्यांची फसवणूक करणे, पगार न देणे, प्रोविडन्ट फंड हडप करणे त्याविरोधात कलम 406,409,34 भा दं वि अंतर्गत कुलाबा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबतची तपास अधिकाऱ्यांनी दिलेली अधिकचची माहिती अशी की, किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात कर्मचारी ऋषिकेश कदम यांनी तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीत त्यांनी सांगितलं की, कदम हे बेस्ट व एम. पी. ग्रुपच्या कराराप्रमाणे वडाळा डेपो येथे कंत्राटी चालक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या सेवा कालावधीमध्ये केलेल्या कामाचा मोबदला म्हणून पगार, भविष्य निर्वाह निधी व ई.एस.आय.सी याची एकून 92,086 रक्कम ही कंपनीने फिर्यादीच्या बॅंक खात्यात न भरता स्वत:च्या वैयक्तिक फायद्याकरिता वापरली, असं फिर्यादीने तक्रारीत आरोप केला.

दरम्यान, फिर्यादी ऋषिकेश कदम यांनी केलेल्या तक्रारीवरून कंपनीचे पदाधिकारी व इतर जबाबदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube