Kolhapur : कणेरी मठावर पंचमहाभूत सोहळ्या दरम्यान 52 गायींच्या मृत्यूने खळबळ

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (72)

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यामधील कणेरी मठावर गेल्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे राहिलेले शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

कोल्हापूर जिल्ह्यामधील कणेरी मठ इथला हा धक्कादायक प्रकार आहे. हा धक्कादायक प्रकार घडलेल्या प्रकाराने मोठी खळबळ कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. याचबरोबर अनेक गायींना विषबाधा झाल्याची देखील माहिती मिळत आहे. यात अद्यापही ३० गायींवर उपचार सुरू आहेत.

या ठिकाणी होते स्पर्धांचे आयोजन 

श्री सिद्धगिरी मठावर आयोजित सुमंगल सोहळ्यात देशी प्रजातींच्या गाय, म्हैस, बकरी, अश्‍व, गाढव, कुत्रे व मांजर या प्राण्याची अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या मठावर होणाऱ्या सुमंगल सोहळ्यांतर्गत २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान हे प्रदर्शन होणार,असल्याची माहिती मठाधिपती श्री काडसिद्धेश्‍वर स्वामी यांनी दिली आहे.

Kasba By Election : कसब्यातील मतदार हिंदुत्ववादी : फडणवीस यांनी केली मांडणी

या प्रदर्शनाने देशी जातीच्या प्रजातींचे संगोपन आणि संवर्धनाची व्याप्ती वाढण्यास मदत होणार असल्याची माहिती देण्यात आली. गाढव हा अतिशय उपयुक्त प्राणी असून देखील तो दुर्मीळ होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर देशात पहिल्यांदाच त्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाने प्रत्येक जनावरांच्या विविध गटांत भव्य स्पर्धा देखील ठेवण्यात आल्या आहेत. त्याकरिता त्यांनी ६९ लाखांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या जनावरांच्या सौंदर्य स्पर्धेत सर्वात सुंदर जनावरांना २१ हजारांपासून ते लाखापर्यंतची बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती समजत आहे.

Tags

follow us